आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील 56 वा सामना विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स या संघामध्ये दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर पार पडला. आरसीबी आणि दिल्ली हे दोघेही याआधीच प्लेऑफमध्ये गेले असल्याने आजची लढत स्पर्धेच्या दृष्टीने औपचारिक होता. पण दोन्ही संघ यंदा फॉर्ममध्ये असल्याने सामना चुरशीची झाला.
सामन्यात नाणेफेक जिंकत विराटने गोलंदाजी निवडली. त्यामुळे दिल्लीचे खेळाडू प्रथम फलंदाजीला आले. दरम्यान सलामीवीर पृथ्वी आणि शिखर यांनी अप्रतिम सुरुवात करुन देत अनुक्रमे 48 आणि 43 धावा झळकावल्या. ज्यानंतरच्या खेळाडूंना मात्र खास कामगिरी करता आली नाही. केवळ शिमरॉन हीटमायरने 29 धावांच्या जोरावर दिल्लीला 164 धावांपर्यंत पोहोचवलं. विजयासाठी 165 धावा करण्याकरता मैदानात आलेल्या आरसीबचे सलामीवीर लगेच बाद झाले. एबीही 29 धावा करुन तंबूत परतला पण केएस भरत (नाबाद 78) आणि मॅक्सेवेल (नाबाद 51) यांनी तुफानी खेळी करत संघाला 7 विकेट्सनी विजय मिळवून दिला.
अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना आरसीबीच्या केेएस भरत याने षटकार ठोकत संघाला 7 विकेट्सनी विजय मिळवून दिला आहे.
एबी बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने केएस भरतसोबत मिळून डाव सांभाळला आहे. आता अखेरच्या 3 षटकात आरसीबीला 31 धावांची गरज आहे.
आरसीबी संघाची सुरुवात खराब झाली असून दोन्ही सलामीवीर देवदत्त आणि विराट हे नॉर्खियाच्या चेंडूवर बाद झाले आहेत.
सलामीवीर शिखर (43) आणि पृथ्वी (48) यांच्या धमाकेदार सुरुवातीच्या जोरावर दिल्लीने 164 धावा बनवल्या आहेत. त्यामुळे आरसीबीला विजयासाठी 165 धावांची गरज आहे.
दिल्लीचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर 18 धावा करुन बाद झाला आहे. सिराजच्या बोलिंगवर डॅनियलने त्याची कॅच घेतली आहे.
सलामीवीर शिखर बाद होताच काही वेळातच सलामीवीर पृथ्वी शॉही बाद झाला आहे. 48 धावा करुन शॉ बाद झाला असून चहलच्या चेंडूवर जियॉर्जी गार्टनने त्याची कॅच घेतली.
दिल्लीला उत्तम सुरुवात करुन दिल्यानंतर शिखर धवन आरसीबीच्या हर्षल पटेलच्या चेंडूवर बाद झाला आहे. धवन 43 धावा करुन बाद झाला आहे.
दिल्लीचे सलामीवीर शिखर आणि पृथ्वी यांनी संघाला उत्तम सुरुवात करुन दिली आहे. 10 ओव्हरनंतर एकही विकेट न गमावता दिल्लीचा स्कोर 88 आहे.
आरसीबीने प्रथम गोलंदाजी निवडल्याने दिल्लीचे सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ मैदानात आले आहेत.
पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), शिमरॉन हिटमायर, रीपल पटेल, अक्षर पटेल, आर आश्विन, कागिसो रबाडा, ए. नॉर्खिया, आवेश खान
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, केएस भारत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हिलीयर्स, डॅनियल ख्रिस्टीयन, शाहबाज अहमद, जियॉर्जी गार्टन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल.
सामन्यात नाणेफेक जिंकत आरसीबीचा कर्णधार विराटने गोलंदाजी निवडली आहे. त्यामुळे दिल्लीचे फलंदाज प्रथम फलंदाजीसाठी येतील.