RCB vs KKR, IPL 2022: रोमांचक सामन्यात अखेर RCB चा तीन विकेटने विजय

| Updated on: Mar 31, 2022 | 12:34 AM

RCB vs KKR, Live Score, IPL 2022:

RCB vs KKR, IPL 2022: रोमांचक सामन्यात अखेर RCB चा तीन विकेटने विजय
IPL 2022: केकेआर विरुद्ध आरसीबी
Follow us on

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) अखेर विजयाचं खात उघडलं आहे. टी-20 क्रिकेटचं स्वरुप बघता 128 ही तशी नीचांकी धावसंख्या. सहज, सोपं, साध्य होणार लक्ष्य. पण 129 धावांच्या विजयी लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची चांगलीच दमछाक झाली. त्यांना चांगलाच संघर्ष करावा लागला. कॅप्टन फाफ डु प्लेसिस, विराट कोहली (Virat Kohli) असे मोठे फलंदाज असलेल्या RCB ला कोलकाता नाइट रायडर्सच्या (KKR) गोलंदाजांनी चांगलच सतावलं. आणखी 15-20 धावा कोलकात्याने केल्या असत्या, तर या सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. मागच्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध 205 धावा करणारा हाच तो आरसीबीचा संघ का? असा प्रश्न आजचा त्यांचा खेळ पाहून पडला. पण अखेरीस कसाबसा आरसीबीने हा सामना जिंकला.

RCB ची प्लेइंग इलेवन – फाफ डु प्लेसी, अनुरा रावत, विराट कोहली, रदरफोर्ड, दिनेश कार्तिक, डेविड विली, शाहबाज अहमद, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप

KKR ची प्लेइंग इलेवन – श्रेयस अय्यर (कॅप्टन), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, नितीश राणा, सॅम बिलिंग्स, आंद्र रसेल, शेल्डन जॅक्सन, सुनील नरेन, टीम साउदी, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती,

Key Events

RCB ने टॉस जिंकला

आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरची टीम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

केकेआरची नजर दुसऱ्या विजयावर

केकेआरने मागच्या सामन्यात चेन्नई विरुद्ध विजय मिळवला होता. तेच आरसीबीवर पंजाब किंग्सने विजय मिळवला होता.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 30 Mar 2022 11:22 PM (IST)

    रोमांचक सामन्यात अखेर RCB चा तीन विकेटने विजय

    शेवटच्या षटकापर्यंत रंगललेल्या सामन्यात अखेर आरसीबीने चार चेंडू आणि तीन विकेट राखून विजय मिळवला. दिनेश कार्तिकने आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. 128 या छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना आरसीबीला संघर्ष करावा लागला.

  • 30 Mar 2022 11:17 PM (IST)

    सामना रोमांचक स्थितीत, हर्षल पटेलची फटकेबाजी

    सामना रोमांचक स्थितीतमध्ये आहे. वेंकटेश अय्यरच्या षटकात हर्षल पटेलने दोन चौकार लगावले. आरसीबीला विजयासाठी 6 चेंडूत 7 धावांची आवश्यकता आहे.


  • 30 Mar 2022 11:11 PM (IST)

    साउदीने एका ओव्हरमध्ये काढल्या दोन विकेट

    टिम साउदीने एका ओव्हरमध्ये दोन महत्त्वाच्या विकेट काढल्या आहेत. रुदरफोर्ड (28) आणि वानिंदु हसरंगा (4) ची विकेट काढली.

  • 30 Mar 2022 10:57 PM (IST)

    शाहबाज अहमद OUT

    RCB ला गरज असताना शाहबाज अहमद आऊट झाला आहे. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर 27 धावांवर शेल्डन जॅक्सनने त्याचं स्टंम्पिंग केलं. RCB ची स्थिती पाचबाद 102 आहे.

  • 30 Mar 2022 10:52 PM (IST)

    15 षटकार RCB च्या चार बाद 94 धावा

    15 षटकार RCB च्या चार बाद 94 धावा झाल्या आहेत. रुदरफोर्ड 25 आणि शाहबाज अहमद 21 धावांवर खेळतोय.

  • 30 Mar 2022 10:39 PM (IST)

    RCB च्या चार बाद 86

    तेरा षटकात RCB च्या चार बाद 86 धावा झाल्या आहेत. रुदरफोर्ड 24 आणि शहाबाज अहमद 16 धावांवर खेळतोय. डेविड विली 18 धावांवर सुनील नरेनच्या गोलंदाजीवर नितीश राणाकरवी झेलबाद झाला.

  • 30 Mar 2022 10:19 PM (IST)

    डेविड विली आणि रुदरफोर्डने डाव सावरला

    तीन विकेट झटपट गेल्यानंतर डेविड विली आणि रुदरफोर्डने डाव सावरला आहे. विली 17 आणि रुदरफोर्ड 14 धावांवर खेळतोय. RCB च्या तीन बाद 59 धावा झाल्या आहेत.

  • 30 Mar 2022 09:45 PM (IST)

    विराट कोहली OUT

    KKR एकापाठोपाठ एक आरसीबीला दणके देत आहे. आधी अनुज रावत, त्यानंतर कॅप्टन फाफ डु प्लेसिस आणि आता विराट कोहली बाद झाला आहे. विराटला 12 धावांवर उमेश यादवने विकेटकीपर शेल्डन जॅक्सनकरवी झेलबाद केले. आरसीबीच्या तीन बाद 22 धावा झाल्या आहेत.

  • 30 Mar 2022 09:42 PM (IST)

    RCB चा मोठा फलंदाज OUT, साउदीने मिळवून दिलं यश

    RCB ची सुरुवात चांगली झालेली नाही. त्यांचा दुसरा विकेट गेला आहे. कॅप्टन फाफ डु प्लेसिसने अवघ्या पाच रन्सवर टिम साउदीच्या गोलंदाजीवर रहाणेकडे सोपा झेल दिला. त्याने अवघ्या पाच रन्स केल्या. आरसीबीची अवस्था तीन बाद 17 झाली आहे.

  • 30 Mar 2022 09:35 PM (IST)

    पहिल्याच षटकात RCB ला झटका

    पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर अनुज रावतच्या रुपाने उमेश यादवने RCB ला पहिला झटका दिला आहे. अनुजला भोपळाही फोडता आला नाही. विराट कोहलीने मैदानावर आल्यानंतर सलग दोन चेंडूंवर दोन चौकार ठोकले. पहिल्या ओव्हरमध्ये आरसीबीच्या एकबाद 10 धावा झाल्या आहेत.

  • 30 Mar 2022 09:19 PM (IST)

    RCB चा भेदक मारा, कोलकात्याचा डाव 128 धावात आटोपला

    RCB च्या भेदक गोलंदाजीसमोर KKR चा डाव 128 धावात आटोपला. कोलकाताकडून आंद्र रसेलने सर्वाधिक 25 धावा केल्या. अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले. RCB कडून वानिंदु हसरंगा, आकाश दीप आणि हर्षल पटेलने भेदक मारा केला. हसरंगाने चार, आकाश दीपने तीन आणि पटेलने दोन विकेट काढल्या.

  • 30 Mar 2022 09:15 PM (IST)

    मूमेंट ऑफ द मॅच

    पावरप्लेमध्ये तीन महत्त्वाचे विकेट काढल्यानंतर आनंदाने खुललेले RCB च्या खेळाडूंचे चेहरे

  • 30 Mar 2022 08:57 PM (IST)

    हसरंगा ऑन फायर, KKR च्या नऊ विकेट

    वानिंदु हसरंगाने कोलकाता नाइट रायडर्सला चौथा धक्का दिला आहे. टिम साउदीला हसरंगाने डु प्लेसिसकरवी झेलबाद केले. साउदीने अवघा एक रन्स केला. नऊ बाद 101 अशी कोलकाताची अवस्था आहे.

  • 30 Mar 2022 08:51 PM (IST)

    आंद्रे रसेल OUT

    आंद्रे रसेलला हर्षल पटेलने विकेटकिपर दिनेश कार्तिककरवी झेलबाद केले आहे. रसेलने 25 धावा केल्या. रसेलकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. हा केकेआरसाठी एक मोठा झटका आहे. आठ बाद 99 अशी त्यांची स्थिती आहे.

  • 30 Mar 2022 08:38 PM (IST)

    हर्षल पटेलने KKR ला दिला झटका

    RCB च्या गोलंदाजांनी कोलकात्याची वाईट अवस्था करुन टाकली आहे. त्यांचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकत नाहीय. हर्षल पटेलने आता सॅम बिलिंग्सला पॅव्हेलियनमध्ये धाडलं आहे. सॅमला 14 धावांवर हर्षलने कोहलीकरवी झेलबाद केले.

  • 30 Mar 2022 08:26 PM (IST)

    वानिंदु हसरंगाचा भेदक मारा

    फिरकी गोलंदाज वानिंदु हसरंगा भेदक मारा करत आहे. शेल्डन जॅक्सनला भोपळाही फोडू न देता त्याला क्लीन बोल्ड केलं. केकेआरची स्थिती 6 बाद 70 धावा आहे.

  • 30 Mar 2022 08:21 PM (IST)

    कोलकाताला पाचवा धक्का

    कोलकाताला पाचवा धक्का बसला आहे. सुनील नरेनला वानिंदु हसरंगाने आकाश दीपकरवी झेलबाद केले. त्याने 12 धावा केल्या. केकेआरची सध्याची स्थिती पाच बाद 67 आहे.

  • 30 Mar 2022 08:16 PM (IST)

    कोलकाताचा डाव अडचणीत

    कोलकाताचा डाव अडचणीत सापडला आहे. आठ षटकात KKR च्या चार बाद 58 धावा झाल्या आहेत. श्रेयस अय्यरला 13 धावांवर डि सिलिव्हाने डु प्लेसिस करवी झेलबाद केले. नितीश राणाला 10 धावांवर आकाश दीपने विलीकरवी झेलबाद केले.

  • 30 Mar 2022 07:57 PM (IST)

    मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणे OUT

    अजिंक्य रहाणे स्वस्तात बाद झाला आहे. मोहम्मद सिराजने त्याला शाहबाज अहदमकरवी (9) धावांवर झेलबाद केले. केकेआरची स्थिती 5.2 षटकात दोन बाद 39 आहे.

  • 30 Mar 2022 07:47 PM (IST)

    आकाश दीपने KKR ला दिला पहिला झटका

    RCB चा वेगवान गोलंदाज आकाश दीपने केकेआरला पहिला झटका दिला आहे. वेंकटेश अय्यरचा आपल्याच गोलंदाजीवर आकाश दीपने झेल घेतला. वेंकटेशने 10 धावा केल्या. केकेआरची सध्याची स्थिती 19/1 आहे.

  • 30 Mar 2022 07:40 PM (IST)

    अजिंक्य रहाणे-वेंकटेश अय्यरची जोडी मैदानात

    दोन षटकात KKR च्या दहा धावा झाल्या आहेत. अजिंक्य रहाणे 2 आणि वेंकटेश अय्यर 8 धावांवर खेळतोय.

  • 30 Mar 2022 07:27 PM (IST)

    अशी आहे KKR ची प्लेइंग इलेवन

    KKR ची प्लेइंग इलेवन – श्रेयस अय्यर (कॅप्टन), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, नितीश राणा, सॅम बिलिंग्स, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन, सुनील नरेन, टीम साउदी, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती,

  • 30 Mar 2022 07:26 PM (IST)

    अशी आहे RCB ची प्लेइंग इलेवन

    RCB ची प्लेइंग इलेवन – फाफ डु प्लेसी, अनुरा रावत, विराट कोहली, रदरफोर्ड, दिनेश कार्तिक, डेविड विली, शाहबाज अहमद, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप