RCB vs LSG : 100 वा सामना खेळणाऱ्या विराटचा खेळ बिघडवणारा हा सिद्धार्थ कोण? Yes sir बोलून घेतली विकेट

| Updated on: Apr 03, 2024 | 9:07 AM

RCB vs LSG : लखनऊ सुपर जायंट्सने दिलेल्या 182 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्यासाठी बंगळुरुला विराट कोहलीकडून एका मोठ्या इनिंगची अपेक्षा होती. पण चांगल्या सुरुवातीनंतर विराट 5 व्या ओव्हरमध्ये आऊट झाला. अगदी नवख्या गोलंदाजाने 100 वा सामना खेळणाऱ्या विराट कोहलीचा खेळ बिघडवला.

RCB vs LSG : 100 वा सामना खेळणाऱ्या विराटचा खेळ बिघडवणारा हा सिद्धार्थ कोण? Yes sir बोलून घेतली विकेट
manimaran siddharth
Image Credit source: PTI
Follow us on

लखनऊ सुपर जायंट्सच आयपीएल 2024 मध्ये दमदार प्रदर्शन सुरु आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या LSG ने सलग दोन सामने जिंकले आहेत. लखनऊच्या या दोन्ही विजयात सर्वाधिक चर्चा झाली, ती वेगवान गोलंदाज मयंक यादवची. त्याने आपल्या वेगाने आधी पंजाब किंग्स आणि नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला चीतपट केलं. मयंक शिवाय LSG चा आणखी एका युवा गोलंदाज बंगळुरु विरुद्ध गुपचूप आपल काम करुन गेला. त्याने फक्त मोहीम फत्ते केली नाही, तर कोचला दिलेला शब्द देखील पूर्ण केला.

बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मंगळवारी 2 मार्चच्या संध्याकाळी बंगळुरु आणि लखनऊमध्ये सामना झाला. या मॅचमध्ये लखनऊने पहिली बॅटिंग केली आणि 181 धावांचा डोंगर उभारला. चिन्नास्वामी स्टेडियमवर ही फार मोठी धावसंख्या नव्हती. या सीजनमध्ये विराट कोहलीने जशी सुरुवात केलीय, ते पाहून असं वाटतय की, त्याला रोखण कठीण आहे. लखनऊवर विराट भारी पडणार असं वाटत होतं.

दुसरा सामना खेळणाऱ्या प्लेयरने घेतली विराटची विकेट

बंगळुरुच्या इनिंगमध्ये 5 व्या ओव्हरचा दुसरा चेंडू विराट कोहलीने लेग साइडला मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याने बॅकवर्ड पॉइंटला कॅच दिली. विराट समोर त्यावेळी लेफ्ट आर्म स्पिनर होता. T20 फॉर्मेटमध्ये लेफ्ट आर्म स्पिनर्सनी नेहमीच विराटला हैराण केलय. पण यावेळी विराटला बाद करणारा फार अनुभवी दिग्गज स्पिनर नव्हता. अवघ्या 25 वर्षांचा मनिमारन सिद्धार्थ होता. IPL मध्ये तो आपला दुसरा सामना खेळत होता. सिद्धार्थचा आयपीएलमधील हा पहिला विकेट आहे.

तू विराटचा विकेट घेणार का?

सिद्धार्थसाठी हा विकेट स्पेशल आहे. कारण त्याने कोच जस्टिन लँगर यांना शब्द दिला होता. मॅच नंतर लखनऊ टीमने सोशल माीडियावर टीमा ड्रेसिंग रुममधील एक व्हिडिओ पोस्ट करुन खुलासा केला. कोच लँगर यांनी सांगितलं की, “त्यांनी जेव्हा प्रॅक्टिसमध्ये सिद्धार्थला आर्म बॉल टाकताना पाहिलं, तेव्हा थेट विचारल की, तू विराटचा विकेट घेणार का? त्यावर सिद्धार्थने फक्त Yes Sir एवढच उत्तर दिलं होतं”


कोण आहे सिद्धार्थ?

एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 100 वा T20 सामना खेळणाऱ्या विराटचा खेळ सिद्धार्थच्या गोलंदाजीने बिघडवला. RCB ला पहिला झटका दिला. सिद्धार्थने पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात डेब्यु केला होता. तामिळनाडूचा हा स्पिनर आतापर्यंत 9 T20 सामने खेळलाय. त्यात त्याने 19 विकेट घेतलेत. 7 फर्स्ट क्लास सामन्यात 27 विकेट घेतलेत. IPL मध्ये या आधी तो दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या ड्रेसिंग रुमचा भाग होता. लखनऊने त्याला या सीजनमध्ये पहिल्यांदा संधी दिली. सिद्धार्थला लखनऊने 20 लाख रुपयाच्या बेस प्राइसमध्ये विकत घेतलं होतं.