MI vs RCB IPL 2023 : विराट कोहलीने रविवारी रात्री धुवाधार बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून फोर-सिक्सचा पाऊस पडला. मुंबईच्या कुठल्याही बॉलरला विराट कोहलीने दया-माया दाखवली नाही. जोफ्रा आर्चरच्या बॉलिंगचा प्रतिस्पर्धी टीमवर एक धाक असतो. पण कोहलीने त्याला सुद्धा आपलं विराट रुप दाखवलं. विराट कोहलीसोबत कॅप्टन डुप्लेसीने सुद्धा जबरदस्त बॅटिंग केली. डुप्लेसीने 73 धावा केल्या. कोहलीने नाबाद 82 धावा फटकावल्या. आरसीबीने विजयासह खात उघडलय. सहाजिकच एवढ्या मोठ्या विजयाच ड्रेसिंग रुममध्ये जोरदार सेलिब्रेशन होणं स्वाभाविक आहे.
आरसीबीच्या विजयानंतर सेलिब्रेशनमध्ये विराट कोहली आणि कॅप्टन फाफ डुप्लेसी खूपच उत्साहात दिसले. दोघांमध्ये एक उत्तम बॉन्डिंग दिसून आली. आरसीबीच्या अँथमवर सगळेच खेळाडू सेलिब्रेशन करत होते. त्याचवेळी डुप्लेसीने एक कृती केली, ज्याने सगळ्याच फॅन्सच लक्ष वेधून घेतलं. डुप्लेसीने विराट कोहलीला मागून पकडल आणि उचललं.
विराट-डुप्लेसीची मैत्री मैदानात दिसली
विराट कोहली आणि डुप्लेसीची खरी मैत्री मैदानात दिसली. दोन्ही अनुभवी फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच कंबरड मोडून ठेवलं. डुप्लेसी आणि विराट दोघेही आक्रमक अंदाजात खेळले. बेहरडॉर्फ असो वा जोफ्रा आर्चर, विराट-डुप्लेसीने सर्वांचा समाचार घेतला.
RCB v MI: Dressing Room Victory Celebration
Captain Faf leads from the front off the field as well, as the team prepares to bring finesse into the team song. Here’s more from last night’s win against MI.#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2023 pic.twitter.com/h8JnkaIn97
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 3, 2023
172 धावांच्या मुंबईच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट-डुप्लेसीने 148 धावांची भागीदारी केली. या एका भागीदारीमुळे आरसीबीने 24 चेंडू राखून विजय मिळवला. 3 सीजननंतर चिन्नास्वामीवर RCB फॅन्ससमोर खेळणाऱ्या कोहलीने प्रेक्षकांना निराश केलं नाही. RCB च्या माजी कर्णधाराने 38 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. कोहली शेवटपर्यंत क्रीजवर टीकून होता. 17 व्या ओव्हरमध्ये सिक्स मारुन त्याने टीमला विजय मिळवून दिला.
विजयात सातत्य ठेवावं लागेल
आरसीबीसाठी सीजनची सुरुवात दमदार झालीय. आरसीबीला आपल्या कामगिरीत सातत्य ठेवाव लागेल. बँगलोरचा पुढचा सामना केकेआर विरुद्ध आहे. 6 एप्रिलला ही मॅच होईल. पीच बँगलोरपेक्षा वेगळा असेल. त्यावेळी डुप्लेसी आणि विराट कशी बॅटिंग करतात, यावर लक्ष असेल.