आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आज सुपर संडे आहे. आजच्या दिवसात दोन टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. आजच्या दिवसातील पहिला सामना पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Banglore) यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडीक्कलने तो निर्णय सार्थ ठरवला. पडीक्कल आणि विराट कोहलीने संघाला 68 धावांची सलामी दिली. विराट कोहली 25 धावांवर बाद झाल्यानंतर पडीक्कलने धावफलक हलता ठेवला.
40 धावा करुन तोदेखील बाद झाला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने (57) अर्धशतकी खेळी करत बँगलोरला दीडशतकी मजल मारुन दिली. एबी डिव्हिलियर्सने 23 धावांचं योगदान दिलं. पंजाबच्या गोलंदाजांनी या सामन्यात बरी गोलंदाजी केली. पंजाबकडून मोजेस हेनरिक्सने 4 षटकात अवघ्या 12 धावा देत 3 बळी घेतले. तर मोहम्मद शमीने 4 षटकात 39 धावा देत 3 बळी घेतली. शमीने तिन्ही बळी अखेरच्या षटकात मिळवले. दरम्यान आरसीबीने दिलेले 166 धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी पंजाबचे फलंदाज मैदानात उतरले. दरम्यान पंजाबची सुरुवात उत्तम झाली. सलामीवीर मयांक (57) आणि राहुल (39) यांच्यानंतर एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता न आल्याने अखेर पंजाबचा संघ 6 धावांनी पराभूत झाला.
अखेरच्या षटकात पंजाबला 19 धावांची गरज होती. पण पंजाबचे फलंदाज 12 धावाच करु शकल्याने अखेर 6 धावांनी आरसीबीचा संघ विजयी झाला आहे.
पंजाबला अखेरच्या षटकात तब्बल 19 धावांची गरज आहे.
पंजाबचा पाचवा गडीही बाद झाला आहे. मार्करमची विकेट जियॉर्ज गार्टनने घेतली आहे.
मयांकला बाद केल्यानंतर लगेचच चहलने सरफराज खानलाही बाद केलं आहे. आता पंजाबला विजयासाठी 4 षटकात 44 धावांची गरज आहे.
आधीच कमी चेंडूत अधिक धावांची गरज असलेल्या पंजाब संघाला आणखी एक झटका बसला आहे. चांगल्या लयी असलेला मयांक अगरवालला चहलने बाद केलं आहे.
पंजाबचा दुसरा गडीही तंबूत परतला आहे. चहलच्या चेंडूवर पडीक्कलने पूरनची कॅच घेत त्याला माघारी धाडलं आहे.
पंजाबचा सलामीवीर मयांक अगरवालने संघाला उत्तम सुरुवात करुन देत स्वत:च अर्धशतकही पूर्ण केलं आहे. 36 चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केलं आहे.
मयांकसोबत मिळून संघाला दमदार सुरुवात करुन देणारा केएल राहुल अखेर 39 धावा करुन बाद झाला आहे. शहबाज अहमदच्या चेंडूवर हर्षल पटेलने त्याची कॅच घेतली आहे.
पंजाब संघाने दमदार सुरुवात केली असून 70 धावा झाल्यातरी एकही सलामीवीर बाद झालेला नाही. 69 चेंडूत 95 धावांची गरज पंजाबला आहे.
प्रथम फलंदाजी करत आरसीबीने 165 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे 166 धावा करण्यासाठी पंजाबचे सलामीवीर केएल राहुल आणि मयांक अगरवाल मैदानात उतरला आहे.
मोहम्मद शमीने अखेरच्या षटकात तिसरी विकेट घेतली आहे. त्याने George Garton ला शून्यावर त्रिफळाचित केलं.
मोहम्मद शमीने अखेरच्या षटकात अजून एक विकेट मिळवली आहे. त्याने शहबाज अहमदला 8 धावांवर असताना बाद त्रिफळाचित केलं. (बँगलोर 165/6)
मोहम्मद शमीने 20 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर बँगलोरला मोठा धक्का दिला. त्याने ग्लेन मॅक्सवेलला 57 धावांवर असताना सरफराज खानकरवी झेलबाद केलं.
सरफराज खानने एबी डिव्हिलियर्सला 23 धावांवर धावबाद केलं. (बँगलोर 146/4)
ग्लेन मॅक्सवेलने 29 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने अर्धशतक फटकावलं.
बँगलोरने तिसरी विकेट गमावली आहे. मोजेस हेनरिके याने देवदत्त पडीक्कलला 40 धावांवर असताना के. एल. राहुलकरवी झेलबाद केलं. (बँगलोर 73/3)
10 व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या मोजेस हेनरिक्सने बँगलोरला लागोपाठ दोन धक्के दिले आहेत. षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने विराट कोहलीला (25) बाद केल, तर त्याच्या पुढच्या चेंडूवर त्याने डॅन ख्रिश्चनचा (00) बळी घेतला.
6 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर देवदत्त पडीक्कलने शानदार षटकार ठोकला, तसेच या षटकातील चौथ्या चेंडूवर पडीक्कलने एकेरी धाव घेत बँगलोरचं अर्धशतक पूर्ण केलं.
शारजाहमध्ये आजच्या सामन्यासाठी, जिथे पंजाब किंग्सने त्यांच्या संघात 3 बदल केले आहेत. त्याच वेळी, आरसीबीने त्याच प्लेइंग इलेव्हनसह मैदानात प्रवेश केला आहे. पंजाब किंग्सने हरप्रीत ब्रार, सरफराज खान आणि मोझेस हेनरिक्सच्या जागी फॅबियन एलन, दीपक हुडा आणि नॅथन एलिस यांना संघात स्थान दिलं आहे.
Team News@RCBTweets remain unchanged.
3⃣ changes for @PunjabKingsIPL as Harpreet Brar, Sarfaraz Khan & Moises Henriques picked in the team. #VIVOIPL #RCBvPBKS
Follow the match ? https://t.co/0E5ehhSWRx
Here are the Playing XIs ? pic.twitter.com/4SBPyL3Qng
— IndianPremierLeague (@IPL) October 3, 2021
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
? Toss Update ?@RCBTweets have elected to bat against @PunjabKingsIPL. #VIVOIPL #RCBvPBKS
Follow the match ? https://t.co/0E5ehhSWRx pic.twitter.com/Q2Gin6gTQk
— IndianPremierLeague (@IPL) October 3, 2021