लंडन : भारतीय क्रिकेट टीमला आयसीसी ट्रॉफी जेतेपदाचा दुष्काळ संपवता आला नाही. भारताला रविवारी आयसीसी WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने हरवलं. भारताला 2013 नतंर एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाहीय. यावेळी टीम इंडियाकडे दुष्काळ संपवण्याची संधी होती. पण असं झालं नाही. ऑस्ट्रेलियाने भारताच स्वप्न मोडलं. ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी मॅच जिंकली. टीम इंडियाच ऑस्ट्रेलियासमोर काहीच चाललं नाही. या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवलं.
टीम इंडियाने या मॅचमध्ये फक्त टॉस जिंकला. त्यानंतर सर्वच सेशनमध्ये ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवलं. पहिली बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियाने 469 धावांचा डोंगर उभारला. तिथेच सामना भारताच्या हातून निसटला होता. टीम इंडियाने पाच दिवसात पाच चूका केल्या. त्यामुळे पराभव झाल.
1 – टीम इंडियाची गोलंदाजी WTC फायनलमध्ये प्रभावी ठरली नाही. टीम इंडियाचा कुठलाही गोलंदाज स्टीव स्मिथ, ट्रेविस हेडला रोखू शकला नाही. भारताने चांगली सुरुवात केली होती. ऑस्ट्रेलियाचे तीन विकेट लवकर काढले होते. त्यानंतर स्मिथ-हेड जोडीने भारतीय गोलंदाजीची लय बिघडवली. पहिल्यादिवशी लय बिघडली, त्यानंतर शेवटपर्यंत तशीच स्थिती होती.
2- ऑस्ट्रेलियाने विशाल धावसंख्या उभारली. त्यानंतर भारतीय फलंदाज धावा करतील अशी अपेक्षा होती. पण दुसऱ्यादिवशी भारतीय फलंदाज ढेपाळले. रोहित, विराट आणि चेतेश्वर सपशेल अपयशी ठरले.
3- तिसऱ्यादिवशी अजिंक्य रहाणे खेळपट्टीवर टिकून होता. तो शतकाच्या जवळ होता. पण त्याला संधी साधता आली नाही. टीम इंडिया पहिल्या डावात 300 धावाही करु शकली नाही. भारताडून फक्त दोघांनी अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूरने अर्धशतकी खेळी केली. पहिल्या डावात दोघांनी हाफ सेंच्युरी झळकवल्या.
4- चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव लवकर संपवायला हवा होता. पण असं झालं नाही. भारताला 444 रन्सच विशाल टार्गेट मिळालं. चौथ्या दिवशी रोहित शर्मा-शुभमन गिल चांगली सुरुवात देतील अशी अपेक्षा होती. पुजारा खराब शॉट खेळून आऊट झाला.
5 – पाचव्यादिवशी भारताला विजयासाठी 280 धावांची गरज होती. टीम इंडियाने चौथ्या दिवशी थोडी झुंज दिली होती. त्यामुळे पाचव्यादिवशी अपेक्षा होत्या. विराट आणि अजिंक्य क्रीजवर होते. पण कोहली खराब शॉट खेळून बाद झाला. रहाणे सुद्धा चालला नाही.