WPL 2023 Auction मुळे टीम इंडियाची विकेटकीपर ऋचा घोषच नशीब पालटलय. भारताच्या या विकेटकीपरला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने 1.90 कोटी रुपयांना विकत घेतलं. ऋचा घोषची बेस प्राइस 50 लाख रुपये होती. बेस प्राइसपेक्षा तिला चारपट जास्त पैसे मिळालेत. ऋचा घोषने WPL मध्ये 1.90 कोटी रुपये मिळाल्यानंतर इमोशनल वक्तव्य केलं. या पैशातून मी माझ्या आई-वडिलांसाठी घर विकत घेणार असल्याच तिने सांगितलं. “मला कोलकातामध्ये एक फ्लॅट विकत घ्यायचा आहे. माझ्या वडिलांनी आणि आईने तिथे रहावं, अशी माझी इच्छा आहे. त्यांनी आपलं आयुष्य एन्जॉय करावं, अशी माझी इच्छा आहे. त्यांनी भरपूर संघर्ष केलाय” असं ऋचा घोष WPL 2023 Auction नंतर म्हणाली.
वडिलांनी कसं घर चालवलं?
ऋचा घोषने सांगितलं की, ‘तिचे वडील अंपायरिंग करुन घर चालवायचे’ ऑक्शननंतर आता वडिलांना इतकी मेहनत करावी लागणार नाही, असं ऋचा म्हणाली.
किती टी 20 सामने खेळलीय?
ऋचा घोषला भारताची पुढची सुपरस्टार क्रिकेटर म्हटलं जातं. ही विकेटकीपर आपल्या आक्रमक बॅटिंगसाठी ओळखली जाते. ऋचाने आतापर्यंत 26 टी 20 मॅचे्समध्ये 458 धावा फटकावल्यात. तिचा स्ट्राइक रेट 135 पेक्षा पण जास्त आहे.
पाकिस्तान विरुद्ध किती धावा केल्या?
ऋचा घोषला टी 20 टीमच फिनिशर म्हटलं जातं. टी 20 वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या सामन्यात ऋचाने पाकिस्तान विरुद्ध 20 चेंडूत नाबाद 31 धावा फटकावल्या. टीम इंडियाच्या विजयात तिने महत्त्वाच योगदान दिलं.
लिलावात एकूण किती खेळाडूंना विकत घेतलं?
लिलावात सर्व पाच फ्रेंचायजींनी मिळून 448 मधून एकूण 87 खेळाडूंना विकत घेतलं. लिलावात 90 स्लॉट्स होते. यात 3 रिक्त राहिले. एकूण 87 खेळाडूंमध्ये 30 परदेशी प्लेयर्स आहेत.
प्रत्येक टीमकडे ऑक्शनसाठी 12-12 कोटींची पर्स होती. म्हणजे एकूण 60 कोटी रुपये होते. लिलावाच्यावेळी एकूण 59.50 कोटी रुपये खर्च झाले.
महागडी खेळाडू कोण ठरली?
भारताची स्टार प्लेयर स्मृती मांधना सर्वात महागडी खेळाडू ठरली. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने तिला 3.40 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं.
सर्वात महागड्या परदेशी खेळाडूंचा रेकॉर्ड दोन ऑलराऊंडर्सच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाची ऐश्ली गार्डनर (गुजराज जायंट्स) आणि इंग्लंडची नॅट सिवर (मुंबई इंडियन्स) यांना 3.20 कोटी रुपये मिळाले.