मुंबई: T20 सीरीजमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 2-1 ने हरवलं. आजपासून टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीज खेळणार आहे. पहिला सामना तिरुवनंतपुरम येथे होईल. ऑस्ट्रेलियाने टी 20 सीरीजमध्ये टीम इंडियाला कडवी टक्कर दिली. आता दक्षिण आफ्रिकेच्या टीमला अशी कामगिरी शक्य आहे का? ते आज समजेल. दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये काही खेळाडू आहेत, जे टीम इंडियाच्या गोलंदाज आणि फलंदाजांसाठी त्रासदायक ठरु शकतात.
टीम इंडियाची डोकेदुखी ठरु शकतो
दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये एक खेळाडू आहे. टी 20 क्रिकेटमध्ये या खेळाडूच मोठं नाव आहे. हा खेळाडू भारतात एक टी 20 सामना खेळला आहे. त्यात तो खातही उघडू शकला नव्हता. चालू सीरीजमध्ये हा खेळाडू टीम इंडियाची डोकेदुखी ठरु शकतो.
दक्षिण आफ्रिकेच्या टीममधील रिली रुसो या फलंदाजाबद्दल आम्ही बोलतोय. टी 20 लीग्स फॉलो करणाऱ्या क्रिकेट चाहत्यांना रिली रुसो हे नाव चांगलं माहित आहे.
तिसऱ्या क्रमांकावर खेळतो
रुसोने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये पुनरागमन केलय. तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा हा खेळाडू स्फोटक फलंदाजी करतो. डाव सावरण्याशिवाय त्याच्याकडे षटकार ठोकण्याची क्षमता आहे.
स्ट्राइक रेट किती आहे?
रुसोने टी 20 इंटरनॅशनलमध्ये 17 डावात 35.23 पेक्षा जास्त सरासरीने 458 धावा फटकावल्या आहेत. यात तीन हाफ सेंच्युरी आहेत. रुसोचा स्ट्राइक रेटही 145 पेक्षा जास्त आहे.
किती टी 20 सामने खेळण्याचा अनुभव?
रिली रुसोकडे 261 टी 20 सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्याने एकूण 6633 धावा केल्या आहेत. रुसोने टी 20 मध्ये आतापर्यंत तीन शतकं झळकावली आहेत. तो स्पिनर्स विरोधात चांगली फलंदाजी करतो. टीम इंडियाच्या गोलंदाजांसाठी रुसो डोकेदुखी ठरु शकतो.
रुसोने 2016 साली टी 20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिज विरोधात भारतात सामना खेळला होता. त्यावेळी तो दोन बॉलमध्ये आऊट झाला होता. त्याला खातही उघडता आलं नव्हतं. आता 6 वर्षानंतर रुसो काय करतो, ते लवकरच समजेल.