Big Bash league: Run out होऊनही बॅट्समन Not Out, त्याने ठोकलं अर्धशतक, जाणून घ्या कसं घडलं? VIDEO

| Updated on: Dec 19, 2022 | 6:02 PM

Big Bash league: क्रिकेटच्या मैदानात घडलेला खूपच इंटरेस्टिंग किस्सा.

Big Bash league: Run out होऊनही बॅट्समन Not Out, त्याने ठोकलं अर्धशतक, जाणून घ्या कसं घडलं? VIDEO
rilee rossouw
Image Credit source: Twitter
Follow us on

सिडनी: ऑस्ट्रेलियात सध्या बिग बॅश लीग टुर्नामेंट सुरु आहे. या मॅचमध्ये रविवारी एक किस्सा घडला, ज्याने सगळेच हैराण आहेत. बॅट्समन OUT असूनही Not Out ठरला. रिप्लेमध्ये बॅट्समन आऊट असल्याच स्पष्ट दिसत होतं. पण तरीही तो रनआऊट झाला नाही. सिडनी थंडर आणि मेलबर्न रेनेगेड्समध्ये हा सामना खेळला गेला. सिडनीचा बॅट्समन रायली रुसो रनआऊट झाला. पण तरीही तो पॅव्हेलियनमध्ये परतला नाही.

टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही

रायली रुसोने या मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं. पण तो आपल्या टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. सिडनीने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 6 विकेट गमावून 174 धावा केल्या. मेलबर्नच्या टीमने एक चेंडू आणि 6 विकेट राखून हे लक्ष्य पार केलं.

क्रीजच्या बाहेर असूनही आऊट दिलं नाही

सिडनीच्या डावात 11 वी ओव्हर सुरु होती. टॉम रोजर्सची गोलंदाजी सुरु होती. रॉजर्सने पाचवा चेंडू फुलटॉस टाकला. रुसो हा चेंडू खेळू शकला नाही. चेंडू पॅडला लागला व अपील केलं गेलं. रुसो रन्स घेण्यासाठी पळाला. दुसऱ्याबाजूला उभ्या असलेल्या एलेक्स रॉसने त्याला माघारी धाडलं. त्यावेळी फिल्डरने सरळ थ्रो स्टम्पवर मारला. रुसो क्रीजच्या बाहेर होता. मात्र त्याला आऊट दिलं नाही.

म्हणून OUT असूनही Not Out

आऊट न देण्यामागे एक कारण आहे. चेंडू पॅडला लागल्यानंतर गोलंदाजाने अपील केलं. अंपायरने रुसोला आऊट दिलं होतं. अंपायरचा निर्णय आल्यानंतर चेंडू डेड समजला जातो. त्यामुळे रुसोला रनआऊट असूनही बाद ठरवलं नाही. रुसोने LBW विरुद्ध रिव्यू घेतला. ज्याचा निर्णय त्याच्या बाजूने लागला. तिसऱ्या पंचांनी त्याला नॉटआऊट ठरवलं. म्हणून रुसो रनआऊट असूनही नाबाद ठरवलं.

अशी झाली मॅच

या मॅचमध्ये रुसोने 38 चेंडूंचा सामना केला. त्याने तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. त्याशिवाय एलेक्सने 23 चेंडूत 39 धावा केल्या. अखेरीस ओलिवर डेविसने 18 चेंडूत वेगवान 33 धावा केल्या. डेविसन चार चौकार आणि एक षटकार मारला. सिडनीने 20 ओव्हर्समध्ये 174 धावा केल्या. मेलबर्नने 19.5 ओव्हर्समध्ये हे लक्ष्य पार केलं.