डेहराडून: क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीचा शुक्रवारी सकाळी रुडकी नारसन येथे भीषण अपघात झाला. ऋषभच्या कारचा चक्काचूर झाला, त्यावरुन या अपघाताची भीषणता लक्षात येते. ऋषभ कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. पण अपघातात मार लागल्याने त्याला कार बाहेर येणं जमत नव्हतं. पण तो कसाबसा कारमधून बाहेर पडला.
ऋषभच्या गाडीत किती लाख होते?
अपघाताच्यावेळी ऋषभच्या गाडीमध्ये 3 ते 4 लाख रुपये होते. अपघातानंतर हे सर्व पैसे रस्त्यावर पडले होते. ऋषभ रस्त्यात वेदनेने विव्हळत होता. यावेळी लोक ऋषभची मदत करण्याऐवजी रस्त्यावर पडलेले पैसे गोळा करुन व्हिडिओ बनवण्यात मुश्गूल होते. अमर उजाला वेबसाइटने हे वृत्त दिलय.
मदतीसाठी धावून आलेले ते दोन युवक कोण?
अपघातानंतर ऋषभच्या कार जवळ जमलेल्यांना माणुसकी धर्माचा विसर पडला होता. पण दोन युवकांमध्ये माणूसकी शिल्लक होती. ते देवदूत बनून ऋषभच्य मदतीला धावून गेले. ऋषभला रुडकीच्या सक्षम रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी दोन युवक त्याच्यासोबत होते. या दोघांपैकी एक युवक पुरकाजी जवळच्या शकरपुर गावचा रहिवासी आहे. घटनास्थळापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या लिब्बरहेरी येथील उत्तम शुगर मिलमध्ये तो नोकरी करतो.
रुग्णालयात ऋषभसोबत कोण होतं?
हा युवक सकाळी ड्युटीवर चालला होता. या दरम्यान त्याने ऋषभला ओळखलं. डॉ. सुशील नागर यांनी सांगितलं की, ऋषभला हॉस्पिटलमध्ये आणलं, त्यावेळी दोन युवक त्याच्यासोबत होते. त्यांनी योग्यवेळी ऋषभला रुग्णालयात दाखल केलं.
ऋषभवर सर्जरी होणार का?
ऋषभला हॉस्पिटलमध्ये आणलं, त्यावेळी त्याची हालत गंभीर होती. पण वेळेबरोबर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली, असं डॉ. सुशील नागर यांनी सांगितलं. ऋषभला मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केलय. तिथे त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी होऊ शकते.