Rishabh Pant: सीरीज सुरु असताना मध्यावरच BCCI ने ऋषभ पंतला दिला आराम

| Updated on: Feb 19, 2022 | 11:34 AM

पंतच्या (Rishabh Pant) फटकेबाजीमुळेच भारताला वेस्ट इंडिज समोर विजयासाठी 187 धावांचे विशाल लक्ष्य ठेवता आले. मागच्या काही काळापासून ऋषभ पंत सातत्याने क्रिकेट खेळतोय.

Rishabh Pant: सीरीज सुरु असताना मध्यावरच BCCI ने ऋषभ पंतला दिला आराम
रिषभ पंत
Follow us on

कोलकाता: वेस्ट इंडिज विरुद्धच्या (India vs West indies) तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यासाठी युवा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) आराम देण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 सीरीजमध्येही ऋषभ पंत खेळणार नाहीय. BCCI ने ऋषभ पंतला आगामी कसोटी मालिका लक्षात घेऊन आराम दिला आहे. श्रीलंके विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेद्वारे ऋषभ पंत आता पुनरागमन करेल. ऋषभ पंत सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. काल वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने नाबाद 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. पंतच्या फटकेबाजीमुळेच भारताला वेस्ट इंडिज समोर विजयासाठी 187 धावांचे विशाल लक्ष्य ठेवता आले. मागच्या काही काळापासून ऋषभ पंत सातत्याने क्रिकेट खेळतोय.

ऋषभ पंत मागच्या काही काळापासून सातत्याने भारतीय संघाकडून क्रिकेट खेळतोय. तिन्ही फॉर्मेटमध्ये तो भारताचे प्रतिनिधीत्व करतोय. पुढच त्याचं वेळापत्रकही व्यस्त आहे. श्रीलंकेविरुद्धची मालिका संपल्यानंतर IPL चा सीजन सुरु होतोय. त्यात ऋषभ दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. तो दिल्लीचा कर्णधार आहे. हेच व्यस्त वेळापत्रक लक्षात घेऊन त्याला आराम देण्यात आला आहे. कालचा सामना 8 धावांनी जिंकून भारताला वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसरा सामना आता फक्त औपचारीकता मात्र आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत इशान किशन विकेटकिपिंगची जबाबदारी संभाळेल.


पंतची दमदार कामगिरी
मधल्याफळीत खेळताना ऋषभने दमदार प्रदर्शन केलं आहे. काही सामन्यांमध्ये संघाला गरज असताना त्याने मोठी खेळी साकारली आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने नाबाद 52 धावांची खेळी केली. या खेळीने भारताच्या विजयात महत्त्वाचा भूमिका बजावली. त्यामुळेच ऋषभपला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. याआधी वनडे सीरीजमध्ये ऋषभने अर्धशतकी खेळी केली होती. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात विकेट फेकतो म्हणून त्याच्यावर टीका झाली होती. त्यानंतर त्याने कसोटीत शतकी खेळी साकारली व वनडेमध्ये 85 धावा केल्या. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात त्याला सलामीलाही संधी देण्यात आली होती. पण तो प्रयोग यशस्वी ठरला नाही.

rishabh pant given break wicketkeeper to skip third t 20 against west indies and sri lanka t 20 series