डेहराडून: टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. ऋषभ या अपघातातून बचावला. पण त्याला गंभीर मार लागला आहे. ऋषभच्या प्रकृतीत सुधारणा होतेय. त्याला ICU मधून आता प्रायव्हेट सूटमध्ये शिफ्ट करण्यात आलय. इन्फेक्शनच्या भितीमुळे त्याला प्रायव्हेट सूटमध्ये हलवलय. दिल्ली आणि डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोशिएशनचे डायरेक्टर श्याम शर्मा यांनी सोमवारी ही माहिती दिली. “इन्फेक्शनच्या भितीमुळे आम्ही त्याचं कुटुंब आणि हॉस्पिटल प्रशासनला प्रायव्हेट सूटमध्ये शिफ्ट करायला सांगितलं. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होतेय. तो लवकरच रिकव्हर होईल” असं शर्मा म्हणाला.
कुठे मार लागलाय?
ऋषभच्या ट्रीटमेंटसाठी राज्य सरकार सर्वतोपरि सहकार्य करेल, असं उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धोनी यांनी रविवारी जाहीर केलं. गाडी चालवताना ऋषभचा डोळा लागल्यामुळे अपघात झाला. ऋषभच्या कपाळाला दोन जखमा झाल्या आहेत. उजव्या गुडघ्याच्या लिगामेंटला मार लागलाय. उजवं मनगट, अँकल आणि पाठीला मार लागलायय. डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
श्याम शर्मा काय म्हणाले?
“जे ऋषभला भेटण्यासाठी रुग्णालयात येतायत, त्यांनी भेट घेणं टाळावं. इन्फेक्शन होण्याचा धोका आहे” असं श्याम शर्मा म्हणाले. “ऋषभची प्रकृती स्थिर असून त्यात सुधारणा होतेय. आमचे बीसीसीआयचे डॉक्टर्स हॉस्पिटलच्या डॉक्टर्सच्या टचमध्ये आहेत. जय शाह स्वत: लक्ष ठेवून आहेत. खड्डा चुकवताना अपघात झाल्याच ऋषभने मला सांगितलं” असं श्याम शर्मा म्हणाले.