मुंबई : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज आहे. ही कसोटी मालिका टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने निर्णायक आहे. त्यामुळे टीम इंडियाला ही सीरिज कोणत्याही स्थितीत जिंकणं भाग आहे. एका बाजूला टीम इंडिया जोरदार सराव करतेय. तर याच दरम्यान क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी गुडन्यूज समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पंतचा 30 डिसेंबरला कार अपघात झाला होता.
पंत या अपघातात जखमी झाला होता. अपघातानंतर गाडीने पेट घेतला. मात्र त्याआधीच पंत गाडीबाहेर पडल्याने अनर्थ टळला. आता पंतबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. स्वत: पंतने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
पंतने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. पंतने या स्टोरीला इमोशनल कॅप्शन दिलंय. “कधी माहिती नव्हतं की बाहेर बसून शुद्ध हवेत मोकळा श्वास घेण्याने चांगलं वाटतं”, असं पंतने कॅप्शन दिलंय. इनसाईड स्पोर्ट्सनुसार, हा फोटो पंतच्या घरचा आहे, तसेच पंतला डिस्चार्ज मिळालाय. पंतवर 4 जानेवारीपासून मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
पंत दिल्लीवरुन रुडकीला आपल्या राहत्या घरी आईला सरप्राईज द्यायला जात होता. या दरम्यान दिल्ली-देहरादून हायवेवर गाडी डिव्हायडरला धडकली. त्यानंतर गाडीने पेट घेतला. मात्र त्याआधीच पंत गाडीबाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातानंतर पंतवर देहरादूनमध्ये 6 दिवस रुग्णालयात ठेवण्यात आलं.
त्यानंतर पंतला पुढील उपचारांसाठी मुंबईत शिफ्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर पंतवर दिनशॉ पारदीवाला यांच्या निगरानीखाली उपचार करण्यात आले. त्यानंतर आता इनसाईड स्पोर्ट्नुसार, पंतला डिस्चार्ज दिलं असल्याचं म्हटलं.
दरम्यान भारत-ऑस्ट्रेलिया 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना हा नागपूरमध्ये खेळवला जाणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.