मुंबई : रिषभ पंत (Rishabh Pant) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)… भारतीय संघाचे दोन खंदे शिलेदार…. संघ अडचणीत असताना या दोन खेळाडूंची बॅट नेहमी बोलते किंबहुना सामन्याचा निकाल बदलवण्याची ताकद या दोन खेळाडूंमध्ये आहे. परंतु आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात (WTC Final 2021) या दोघाही खेळाडूंनी एक मोठी चूक केली ज्या चुकीची किंमत भारताने मोजली आहे. भारताच्या हातून 144 वर्षांच्या गौरवशाली इतिहासातील पहिल्यांदा मिळू शकणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची गदा निसटली आहे. जर पंत आणि पुजाराने जबाबदारीने ही चूक टाळली असती, तर सामन्याचा निकाल काही वेगळा लागला असता आणि करोडो भारतवासियांनी देशभरात दिवाळी साजरी केली असती. पण आता हे केवळ स्वप्नच राहिलं आहे… किवी संघाने भारताचा 8 विकेट्सने दणदणीत पराभव केला आहे. त्याचबरोबर पहिल्यांदा टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना जिंकण्याची अद्वितीय कामगिरी केली आहे. (Rishabh Pant irresponsible Shot Cheteshwar pujara Dropped Ross taylor Catch India vs New Zealand WTC Final 2021)
दुसऱ्या डावांत भारतीय संघ अडचणीत सापडलेला असताना रिषभ पंत बेजबाबदार फटका खेळून तंबूत परतला. तत्पूर्वी त्याने संघासाठी 41 रन्स केले होते. परंतु त्याने आणखी 10 ते 15 ओव्हर्स पीचवर पाय रोवायला हवे होते, भलेही त्याच्या बॅटमधून कमी धावा आल्या असत्या, पण रिषभने बेजबाबदार फटका मारुन आऊट व्हायला नको होतं, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात होत आहे.
रिषभ पंत जर पीचवर असता तर मॅचचा निकाल काही वेगळाच लागला असता. गाबाच्या पिचवर त्याने जी कमाल करुन दाखवली होती, तशाच खेळीची भारतीय क्रिकेट रसिकांना आशा होती. परंतु रिषभने पुढचा मागचा कशाचाही विचार न करता हवेत बॉल खेळला आणि हेन्री निकोलसने त्याचा अप्रतिम कॅच पकडून रिषभच्या खेळीची सांगता केली आणि भारताच्या स्वप्नांना लगाम घातला.
Rishabh Pant goes for 41, a terrific knock ended with an unnecessary shot. He’s playing well, but the aggressive approach got the better of him. That shot wasn’t needed at all, but nevertheless a tremendous fightback from Pant. pic.twitter.com/0GAW7rwyv3
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 23, 2021
भारत दुसऱ्या डावात केवळ 170 धावांवर ऑल आऊट झाला. न्यूझीलंडला जिंकण्यासाठी भारताने 139 धावांचे छोटेखानी लक्ष ठेवलं. मग अशा वेळी भारताने क्षेत्ररक्षणात कमाल दाखवायला हवी होती. परंतु भारताच्या चेतेश्वर पुजाराने अगदी निर्णाक क्षणी संघाचा किवी धडाकेबाज बॅट्समन रॉस टेलरचा कॅच सोडला. भारताने मॅच गमावण्यात या मॅचचा मोठा वाटा राहिला.
31 व्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने रॉस टेलरला एक अप्रतिम बॉल टाकला. रॉसच्या बॅटची कड लागून बॉल पूजाराच्या हातात गेला. पण पुजाराच्या हातून बॉल सटकला आणि टेलर आउट होता होता वाचला. त्यावेळी 84 धावांवर दोन गडी बाद असा न्यूझीलंडचा स्कोअर होता. जर त्यावेळी टेलरचा कॅच पुजाराने पकडला असता तर न्यूझीलंडचा संघ दडपणात आला असता आणि मॅचचा निकाल काही वेगळाही लागू शकला असता, अशी समाज माध्यमांवर चर्चा आहे.
Cheteshwar Pujara dropped Ross Taylor, not sure it was only a catch or the trophy (Mace) ?? #INDvNZ #WTC21final #WTC21 pic.twitter.com/6VuSH8aB2w
— Ahmad Haseeb (@iamAhmadhaseeb) June 23, 2021
(Rishabh Pant irresponsible Shot Cheteshwar pujara Dropped Ross taylor Catch India vs New Zealand WTC Final 2021)
हे ही वाचा :
WTC Final 2021 : म्हणून अंतिम सामन्यात आमचा पराभव झाला, विराटने सांगितली 2 कारणं!