Rishabh Pant Accident: सीट बेल्टमुळे ऋषभचे प्राण वाचले का? वाचा एक्सपर्ट ओपिनियन

| Updated on: Dec 30, 2022 | 4:49 PM

Rishabh Pant Accident: जेव्हा तुम्ही सीट बेल्ट लावत नाही, तेव्हा शरीराच्या कुठल्या भागाला मोठा मार लागू शकतो? आणि सीट बेल्टमुळे काय फायदा होऊ शकतो? ऋषभच्या बाबतीत काय झालं? जाणून घ्या सर्वकाही....

Rishabh Pant Accident: सीट बेल्टमुळे ऋषभचे प्राण वाचले का? वाचा एक्सपर्ट ओपिनियन
Rishabh-Accident
Image Credit source: Screengrab
Follow us on

Rishabh pant Road accident: भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. पंत त्याच्या कारने दिल्लीहून उत्तराखंडच्या दिशेने चालला होता. त्यावेळी दिल्ली-डेहराडून हाय वे वर रुडकीजवळ ऋषभच्या कारला भीषण अपघात झाला. पंतची प्रचंड वेगात असलेली कार डिवायडरला धडकली. ऋषभचा चेहरा, पाय, हात आणि पाठीला गंभीर मार लागलाय. ऋषभने कार चालवताना सीट बेल्ट बांधला नव्हता, त्यामुळे त्याला दुखापती झाली, असं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलय.

पण खरंच असं आहे का? सीट बेल्ट लावल्यामुळे पंतचे प्राण वाचलेत का? डॉक्टरांकडून जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तर.

वरिष्ठ न्युरो सर्जन डॉ. राजेश कुमार काय म्हणाले?

वरिष्ठ न्युरो सर्जन डॉ. राजेश कुमार म्हणाले की, “बहुतांश कार अपघातात हेड इंजरीमुळे मृत्यू होतो. अशा अपघातात कारचा वेग जास्त असतो” “कारचा वेग प्रचंड असतो. या दरम्यान गाडी धडकल्यास डोकं समोर जाऊन आदळतं. ब्रेनचे काही भाग खूप नाजूक असतात. त्यामुळे धडकल्यानंतर डोक्याच्या काही आर्टरीज एकत्र डॅमेज होतात. अशा स्थितीत ब्रेन हॅमरेज होऊ शकतं. त्यामुळे जागीच मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. सीट बेल्ट न लावल्यामुळे हे होऊ शकतं. पण बेल्ट असल्यास डोकं समोर आदळण्याची शक्यता कमी असते. अशा स्थितीत हेड इंजरी होत नाही. फक्त किरकोळ दुखापत होऊ शकते” असं डॉ. राजेश कुमार म्हणाले.

सीट बेल्टमुळे वाचले प्राण

पंतने सीट बेल्ट लावला नव्हता, हा दावा चुकीचा असल्याचं डॉ. राजेश म्हणाले. ऋषभने सीट बेल्ट लावला नसता, तर त्याची हालत आणखी खराब झाली असती. पंतच्या गाडीचा वेग 100 KM च्या आसपास होता. अशावेळी बेल्ट लावला नसता, तर हेड इंजरी होऊ शकली असती. त्यात माणूस वाचण्याची शक्यता कमी असते. पंतच्या फोटोंवरुन त्याला डोक्याला गंभीर मार लागला नसल्याचं दिसतय. कारचा स्पीड आणि स्थिती पाहून अपघात किती भयानक होता, त्याती कल्पना येते.

सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूमागे कारण काय?

“टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री एका मोठ्या आलिशान गाडीमधून प्रवास करत होते. ते मागच्या सीटवर बसले होते. त्यांनी सीट बेल्ट लावला नव्हता. अपघाताच्यावेळी त्यांची कार धडकल्यानंतर त्यांना मोठी हेड इंजरी झाली. त्यांच्या अनेक ऑर्गननी काम करणं बंद केलं. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला” असं डॉ. राजेश म्हणाले.