डेहराडून: ऋषभ पंत सध्या डेहराडूनच्या रुग्णालयात आहे. 30 डिसेंबरला ऋषभच्या कारला भीषण अपघात झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला. ऋषभची कार डिवायडरला धडकून पलटली. ऋषभच्या कारला आग लागली. पण ऋषभ कसाबसा कारच्या बाहेर पडला. ऋषभ रुग्णालयात आहे. अनेक जवळच्या लोकांनी रुग्णालयात येऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. पण ऋषभ दोन व्यक्तींची आतुरतेने वाट पाहत होता, ज्यांना तो आयुष्यात कधीही विसरणार नाही. हरियाणा रोडवेजचा ड्रायव्हर रजत कुमार आणि त्याच्यासोबत असलेल्या कंडक्टर या त्या दोन व्यक्ती आहेत.
सर्वप्रथम पंतची मदत केली
हरियाणा रोडवेजचा ड्रायव्हर आणि कंडक्टर ऋषभला भेटण्यासाठी रुग्णालयात आले होते. पंत सुद्धा या दोघांची वाट पाहत होता. अपघातानंतर ऋषभला त्या दोघांना भेटायचं होतं. हरियाणा रोडवेजचा ड्रायव्हर रजत कुमारने सर्वप्रथम पंतची मदत केली. त्याने वेळीच पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे पंतवर उपचार शक्य झाले.
Rajat Kumar and his friend finally met Rishabh pant in max hospital, Rishabh pant was eagerly waiting to met them ❤️
First to help. pic.twitter.com/FLPRQgBtMF
— Rishabh pant fans club (@rishabpantclub) January 2, 2023
कोणी मदतीसाठी पुढे आलं नाही, तेव्हा…..
ऋषभ पंत आणि रजत कुमार यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये पंतची आई सुद्धा दिसते. पंतचा चेहरा दिसत नाहीय. पण रिपोर्ट्सनुसार, पंत त्या दोघांना भेटून आनंदी होता. मदतीसाठी त्याने आभार मानले. ऋषभ पंतच्या गाडीला आग लागली. त्यावेळी अनेक गाड्या तिथून गेल्या. पण कोणी मदतीसाठी पुढे आलं नाही. त्यावेळी हरयाणा रोडवेजचा ड्रायव्हर रजत कुमार मदतीसाठी पुढे आला.
कशी आहे पंतची तब्येत?
ऋषभ पंतच्या तब्येतीत सातत्याने सुधारणा होतेय. आयसीयूमधून त्याला प्रायव्हेट सूटमध्ये हलवण्यात आलय. दोन-तीन दिवसात पंतला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. पण मैदानावर पुनरागमनासाठी त्याला वेळ लागेल. पायाला झालेली दुखापत बरी व्हायला वेळ लागेल.