Marathi News Sports Cricket news Rishabh pant place in danger in team india because of these 3 wicketkeeper kl rahul ishan kishan sanju samson
IND vs AUS : ऋषभ पंतच्या करिअरला एकाचवेळी 3 विकेटकीपरपासून धोका, घेऊ शकतात त्याची जागा
Rishabh Pant : कमीत कमी 6 ते 7 महिने त्याला क्रिकेटच्या मैदानापासून लांब रहाव लागणार आहे. ऋषभ पंत IPL 2023 मध्ये सुद्धा खेळणार नाहीय. ऑगस्ट 2023 पर्यंत ऋषभ पंतच मैदानावर कमबॅक कठीण दिसतय.
Follow us on
Rishabh Pant : अपघातानंतर ऋषभ पंतवेगाने रिकव्हरी करतोय. पण टीममध्ये कमबॅक करणं ऋषभ पंतसाठी सोपं नसेल. त्याच्यासमोर आव्हानात्मक परिस्थिती असू शकते. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता. त्याला मैदानावर पुनरागमन करण्यासाठी वेळ लागेल. कमीत कमी 6 ते 7 महिने त्याला क्रिकेटच्या मैदानापासून लांब रहाव लागणार आहे. ऋषभ पंत IPL 2023 मध्ये सुद्धा खेळणार नाहीय. ऑगस्ट 2023 पर्यंत ऋषभ पंतच मैदानावर कमबॅक कठीण दिसतय. ऋषभ पंतच्या टीम इंडियातील स्थानाला धोका आहे. भारताकडे 3 धोकादायक विकेटकीपर बॅट्समन आहेत. वनडे आणि टी 20 मध्ये ऋषभ पंतच स्थान हिसकावू शकतात. हे 3 विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतपेक्षा पण धोकादायक आणि स्फोटक आहेत. हे 3 विकेटकीपर बॅट्समन कोण आहेत? त्यावर एक नजर मारुया.
ऋषभ पंत बरेच महिने क्रिकेटच्या मैदानापासून लांब रहाणार आहे. स्फोटक विकेटकीपर फलंदाज इशान किशनसाठी ही एक चांगली संधी आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत इशान किशन वनडे आणि टी 20 मध्ये खेळण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. भारतीय टीम मॅनेजमेंट 17 मार्चपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु होणाऱ्या 3 मॅचच्या वनडे सीरीजमध्ये इशानला संधी देऊ शकते. मागच्यावर्षी 10 डिसेंबर 2022 रोजी इशान किशन बांग्लादेश विरुद्ध चटगाव वनडेमध्ये 131 चेंडूत 210 धावांची इनिंग खेळला होता. याच इनिंगमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध 17 मार्चपासून सुरु होणाऱ्या 3 वनडे सामन्यांच्या सीरीजमध्ये संधी मिळणार आहे. इशान किशन टीम इंडियात ऋषभ पंतची जागा घेऊ शकतो. इशान किशन ऋषभ पंतपेक्षा जास्त धोकादायक आहे.
संजू सॅमसन भारताचा आणखी एक स्फोटक विकेटकीपर बॅट्समन आहे. संजू सॅमसन सुद्धा विकेटकीपिंग बरोबर स्फोटक बॅटिंग करु शकतो. ऋषभ पंत आता 6 ते 7 महिने क्रिकेटच्या मैदानापासून लांब रहाणार आहे. अशावेळी संजू सॅमसनकडे चांगली संधी आहे. संजू सॅमसन मधल्याफळीत बॅटिंग करतो. त्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. संजू सॅमसनला ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीजसाठी संधी मिळालेली नाही. IPL 2023 मध्ये शानदार प्रदर्शन करुन तो टीम इंडियात स्थान मिळवू शकतो. तो राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन आहे.
केएल राहुल सुद्धा ऋषभ पंतच्या जागेसाठी धोकादायक आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन वनडे सामन्यांच्या सीरीजमध्ये विकेटकीपर बॅट्समन म्हणून केएल राहुलला पहिलं प्राधान्य मिळू शकतं. राहुलने पंतच्या जागी विकेटकीपिंग केली, तर ऋषभच्या जागी एक्स्ट्रा ऑलराऊंडरला संधी मिळू शकते. केएल राहुलने याआधी सुद्धा विकेटकीपिंगची जबाबदारी संभाळली आहे. तो यशस्वी झाल्यास ऋषभचा मार्ग अधिक बिकट होईल.