अहमदाबाद: ऋषभ पंत (Rishabh Pant) मैदानावर जोरदार फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. पण त्याचवेळी मैदानावर तो अशाही काही गोष्टी करतो, की पाहणाऱ्याला हसू येईल. आज वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे सामन्याआधी मैदानावर असंच दृश्य पहायला मिळालं. वेस्ट इंडिज विरुद्ध तिसरी वनडे सुरु होण्याआधी (India vs West Indies, 3rd ODI) मैदानावर खेळाडूंचा वॉर्मअप सुरु होता. त्यावेळी ऋषभ पंतच्या एका कृतीने रोहित शर्मा (Rohit Sharma) चांगलाच घाबरला. मैदानावर जे घडलं, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होतोय. मैदानावर वॉर्मअप सुरु असताना ऋषभच्या कृतीमुळे भारतीय कर्णधारही काही क्षणासाठी दचकला. अलीकडे ऋषभ पंतवर बेजबाबदार फटके खेळल्याबद्दल बरीच टीकाही झाली आहे. पण त्याने चुकांमधून बोध घेत दमदार फलंदाजी सुद्धा केली आहे.
नेमकं काय घडलं?
रोहित शर्मा मैदानात चालत होता. त्याचा चेहरा जमिनीकडे होता. तितक्यात अचानक ऋषभ पंत समोर आला व त्याने रोहितच्या पोटाच्या दिशेने आपला पाय उचलला. अचानक पंतचा पाय समोर पाहून रोहित शर्माही दचकला. आपल्याला तो लाथ मारतोय की, काय असं रोहितला वाटलं. त्यानंतर रोहित पंतला काहीतरी बोलला. पंतनेही त्यावर हसूनच रोहितला काहीतरी सांगितलं.
he’s a kid pic.twitter.com/oQ4AwkZtAO
— riya (@reaadubey) February 11, 2022
पंतची दमदार फलंदाजी
तिसऱ्या वनडेआधी वॉर्मअप दरम्यान ऋषभ भले मस्करी करताना दिसला. पण मॅचमध्ये त्याने तितकीच गांभीर्याने फलंदाजी केली. पंतने संकटात सापडलेला भारताचा डाव सावरला. पंत आणि श्रेयस अय्यर दोघे संकटमोचक ठरले. 47 चेंडूत पंतने अर्धशतक झळकावलं. 56 धावांवर पंत आऊट झाला. चौथ्या विकेटसाठी त्याने श्रेयस अय्यर सोबत 110 धावांची भागीदारी केली.
rishabh pant rohit sharma warm up funny video india vs west indies 3rd odi