मुंबई : भारतीय टीमच्या (Team India) वेस्ट इंडिजसोबत एकदिवसीय सामने आणि टी-20 सीरीजकडे सर्वांचे लक्ष आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच आहे. बातमीनुसार टीम इंडियामध्ये हिमाचल प्रदेशचा (Himachal Pradesh) धाकड खेळाडू ऋषी धवनचे (Rishi Dhawan) यावेळी पुनरागमन होऊ शकते. या खेळाडूने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करून दाखवली होती. ऋषी धवन कर्णधारपदी असताना हिमाचल प्रदेशने 2021 ची विजय हजारे ट्रॉफी जिंकली होती. यापूर्वी ऋषी धवन भारताकडून खेळला आहे. 2016 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो भारताकडून खेळला आहे. परंतु फारशी चमकदार कामगिरी करू न शकल्याने त्याला संघाबाहेर व्हावे लागले. दी न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार निवडकर्ते ऋषी धवनला वनडे सीरिजसाठी भारतीय संघात घेऊ शकतात. अष्टपैलू खेळाडू म्हणून टीम इंडियामध्ये वेंकटेश अय्यरचा समावेश आहेच. परंतु निवडकर्त्यांना धवनला संधी द्यायची आहे.
धवनने विजय हजारे ट्राँफी जिंकण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. धवनने 8 मँचेसमध्ये 17 विकेट आणि 458 धावा फटकावल्या होत्या. धवन कायम फिनिशरच्या भूमिकेतच खेळताना दिसा आहे. त्यामुळे धवनची निवड होण्याची शक्यता जास्त आहे. विजय हजारे ट्राँफीमध्ये त्याने हिमाचल प्रदेशचे प्रतिनिधित्व केले होते. त्याच्या नेतृत्वात या टीमने पहिल्यांदाच कोणतीही देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. अंतिम सामन्यात हिमाचल प्रदेशने तामिळनाडूसारख्या तगड्या संघाला गारद करून विजेतेपदावर नाव कोरले.
31 वर्षीय ऋषी धवन उजव्या हाताने फलंदाजी करतो. तसेत तो मीडियम पेसर आहे. ए लिस्ट क्रिकेटमध्ये तो 109 सामने खेळला असून त्यात त्याने 2385 धावा केल्या आहेत. 2021 च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याचे प्रदर्शन थक्क करणारे होते. यामध्ये धवनने 127.22 च्या स्ट्राईक रेट आणि 73.33 च्या सरासरीने धावा केल्या. आठपैकी पाच सामन्यात त्याने अर्धशतक ठोकले.
जर ऋषी धवनची भारतीय संघात निवड झाली तर तब्बल सहा वर्षांनंतर धवनचे पुनरागमन होईल. त्यांने जानेवारी 2016 मध्ये अखेरची टीम इंडियाची जर्सी घातली होती. त्यावेळी तो ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर खेळला होता. त्याच्या नावे 3 एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्यात त्याने 12 धावा केल्या आहेत आणि 1 विकेट घेतली होती. त्यामुळे धवनला टीम इंडियाच्या बाहेर जावे लागले होते. तरीही 2016 मध्ये त्याने झिम्बाब्वे भारताच्या टी-20 संघात स्थान मिळवले. त्याला एकच संधी मिळाली. या एका सामन्यात त्याने एक धाव केली आणि एक विकेट घेतली. त्यानंतर त्याला पुन्हा संधी मिळाली नाही.
इतर बातम्या
ICC Women’s Cricketer 2021: विराट-रोहितला जमलं नाही ते सांगलीच्या स्मृती मानधनाने करुन दाखवलं
(Rishi Dhawan will be back in Team India after 6 years)