मुंबई: सुरेश रैनाने दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. काही दिवसांपूर्वी त्याने क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मेटचा निरोप घेतला. भले सुरेश रैना क्रिकेटच्या मैदानापासून लांब राहिला असेल. पण वयाच्या 35 व्या वर्षीही मैदानावरील त्याची चपळाई कायम आहे. जगातील बेस्ट फिल्डर्समध्ये सुरेश रैनाचा समावेश व्हायचा. पुन्हा एकदा रैनाने क्रिकेटच्या मैदानात चित्त्याची चपळाई दाखवली. सध्या तो रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये खेळतोय.
जबरदस्त फिल्डिंगचा नमुना
सुरेश रैनाने या टुर्नामेंटमध्ये एका सामन्यात हवेमध्ये झेप घेऊन ऑस्ट्रेलियन फलंदाज बेन डंकची जबरदस्त कॅच पकडली. या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये सेमीफायनलची मॅच होती. ऑस्ट्रेलियाच्या इनिंगमध्ये 16 व्या षटकात सुरेश रैनाने जबरदस्त फिल्डिंगचा नमुना दाखवला.
मिथुनच्या चेंडूवर डंकने हवेत खेळला फटका
सेमीफायनल मॅचमध्ये बेन डंक जबरदस्त बॅटिंग करत होता. भारताकडून अभिमन्यू मिथुन गोलंदाजी करत होता. त्याने ओव्हरमधील शेवटचा चेंडू वाइड टाकला. डंकला या चेंडूवर चौकार मारायचा होता. त्याने हवेत फटका खेळला. चेंडू थेट पॉइंटच्या दिशेने गेला.
चाहत्यांना आठवले जुने दिवस
पॉइंटला उभ्या असलेल्या 35 वर्षाच्या रैनाची नजर डंकच्या हवाई शॉटवर होती. त्याने झेप घेऊन हा झेल पकडला. रैनाची ही कॅच पाहून चाहत्यांना जुने दिवस आठवले. त्यावेळी रैना मैदानात अशीच फिल्डिंग करायचा. या सेमीफायनल मॅचचा निकाल आज गुरुवारी लागेल. पावसाने या मॅचमध्ये खलनायकाची भूमिका बजावली.
पावसाने आणला व्यत्यय
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 136 धावा केल्या. पावसाने या सामन्यात व्यत्यय आणला. त्यामुळे सामना थांबवावा लागला. आता उर्वरित सामना आज गुरुवारी खेळला जाईल. बेन डंकने 26 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 46 धावा केल्या.
An absolute stunner by Suresh Raina in the field, he’s still so good in that department. pic.twitter.com/KwN33c03Tl
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 28, 2022
आयपीएलमध्ये रैनाला कोणी खरेदीदार नाही
डंकशिवाय ऑस्ट्रेलियन लीजेंडकडून एलेक्सने 31 चेंडूत 35 धावा कुटल्या. कॅप्टन शेन वॉटसनने 21 चेंडूत 30 धावा फटकावल्या. अभिमन्यु मिथुनने 15 धावात 2 विकेट घेतल्या. रैनाला आयपीएल 2022 मध्ये कोणी खरेदीदार मिळाला नव्हता. चेन्नई सुपर किंग्सने सुद्धा त्याच्यावर बोली लावली नव्हती.