टी20 वर्ल्डकपमधील रोहित शर्माच्या 5 खेळींवर आयसीसीचं शिक्कामोर्तब, ही फटकेबाजी ठरली सर्वोत्तम

| Updated on: Jul 02, 2024 | 4:49 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्माच्या बिनधास्त खेळीची चर्चा रंगली. विरोधी संघाची रणनिती खोडून काढण्यात रोहित शर्माची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. एकूण 8 सामन्यापैकी रोहित शर्माच्या पाच खेळींवर आयसीसीने शिक्कामोर्तब केलं आहे. जाणून घ्या रोहित शर्माच्या खेळींबाबत

टी20 वर्ल्डकपमधील रोहित शर्माच्या 5 खेळींवर आयसीसीचं शिक्कामोर्तब, ही फटकेबाजी ठरली सर्वोत्तम
Image Credit source: BCCI
Follow us on

भारताने 11 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आयसीसी चषकावर नाव कोरलं आहे. ही संघ 2023 मध्ये चालून आली होती. मात्र पदरी अपयश पडलं. मात्र पराभवातून खचून न जाता रोहित शर्मा पुन्हा एकदा सज्ज झाला. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एकही सामना न गमवता जेतेपदावर नाव कोरलं. कर्णधार रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी या स्पर्देत केली. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली. विकेटची पर्वा न करता रोहित शर्माचा आक्रमक अंदाज दिसून आला. रोहित शर्मा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 8 सामने खेळला. यात 36.71 च्या सरासरीने 257 धावा केल्या. वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. टीम इंडियाला जेतेपद मिळवून दिल्यानंतर रोहित शर्माने टी20 वर्ल्डकपमध्ये खेळलेल्या पाच बेस्ट खेळींची आयसीसीने निवड केली आहे. रोहित शर्मा टी20 वर्ल्डकपची नऊ पर्व खेळला. यात 47 सामन्यात 44 डाव खेळला.यापैकी पाच बेस्ट इनिंगची निवड आयसीसीने केली आहे.

रोहित शर्मा पहिला टी20 वर्ल्डकप 2007 मध्ये खेळला होता. तेव्हा पहिलाच सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध केला होता. त्या सामन्यात रोहित शर्माने 40 चेंडूंमध्ये नाबाद 50 धावा केल्या होता. त्यानंतर 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 46 चेंडूत नाबाद 79 धावा स्मरणात राहणाऱ्या आहेत. त्यानंतर 2014 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्द 55 चेंडूत नाबाद 62 धावा केल्या होत्या. 2021 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 47 चेंडूत 74 धावा केल्या होत्या. तर 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 41 चेंडूत 92 धावांची खेळी केली होती. याच खेळीमुळे टीम इंडियाने उपांत्य फेरीत पोहोचली होती.

रोहित शर्माने टी20 वर्ल्डकप कारकिर्दिती 12 अर्धशतकांसह 1220 धावा केल्या. यात 92 ही धावसंख्या सर्वोत्तम राहिली. टी20 वर्ल्डकपमध्ये त्याने 115 चौकार आणि 50 षटकार मारले. भारताकडून सर्वाधिक चौकार आणि षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने टी20 क्रिकेट करिअरमध्ये 159 सामन्यात 151 डाव खेळला आहे. त्यानेत य्ने 4231 धावा केल्या आहेत. यात 5 शतकं आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहित शर्मने आपल्या टी20 करिअरमध्ये 383 चौकार आणि 205 षटकार मारले. यात त्याचा नाबाद 121 ही धावसंख्या सर्वोत्तम राहिली आहे.