T20 World Cup : ‘या’ दोघांना हार्दिक पांड्या वर्ल्ड कप टीममध्ये नको होता, पण कोणाच्या दबावामुळे सिलेक्शन?

| Updated on: May 14, 2024 | 1:43 PM

T20 World Cup : रिपोर्ट्सनुसार हार्दिक पांड्या T20 वर्ल्ड कप 2024 च्या टीममध्ये नको होता. काही बातम्यांमध्ये हे म्हटलय. मग हार्दिक पांड्याच टीममध्ये सिलेक्शन कसं झालं? पडद्यामागून ती कोणती अदुश्य शक्ती हार्दिकच्या पाठिशी उभी राहिली.

T20 World Cup : या दोघांना हार्दिक पांड्या वर्ल्ड कप टीममध्ये नको होता, पण कोणाच्या दबावामुळे सिलेक्शन?
Hardik Pandya
Image Credit source: PTI
Follow us on

IPL 2024 चा सीजन संपत आला असून आता सगळ्यांच लक्ष पुढच्या महिन्यापासून सुरु होणाऱ्या T20 वर्ल्ड कपकडे लागलं आहे. येत्या 2 जूनपासून अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये T20 वर्ल्ड कप सुरु होणार आहे. या वर्ल्ड कप आधी टीम इंडियाच्या गोटात चिंता आहे. त्याच कारण आहे, कॅप्टन रोहित शर्मा आणि व्हाइस कॅप्टन हार्दिक पांड्यामधील मतभेदांची चर्चा. हे दोघेही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीममधून एकत्र खेळतात. त्यांच्यात मतभेदांची सुरुवातही तिथूनच झाल्याच बोललं जातय. हा वाद टीम इंडियाच्या T20 वर्ल्ड कप 2024 जिंकण्याच्या स्वप्नांच्या आड येऊ शकतो. रोहित शर्मा आणि अजित आगरकर या दोघांना हार्दिक पांड्या T20 वर्ल्ड कप टीममध्ये नको होता. पण कोच आणि सिलेक्टर्सना नको असताना, हार्दिक पांड्या टीममध्ये कसा आला? त्यामागे काय कारण आहे?

T20 वर्ल्ड कप 2024 साठी टीम इंडियाच सिलेक्शन मागच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालं. टीम सिलेक्शन अहमदाबादमध्ये झालं. आता काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलय की, सिलेक्शनसाठी हार्दिक पांड्या निवड समितीची पसंत नव्हता. रोहित शर्माला हार्दिक पांड्या टीममध्ये नको होता. मग, हार्दिक पांड्याच टीममध्ये सिलेक्शन कसं झालं? हार्दिकची फक्त निवडच झाली नाही, तर त्याला उपकर्णधार बनवण्यात आलं. म्हणजे T20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक रोहितचा डेप्युटी असेल. कोच आणि चीफ सिलेक्टरच्या मनात नसताना हे कसं शक्य झालं?

कोणाचा दबाव होता?

सूत्रांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलय की, हार्दिक पांड्याला मोठ्या दबावामुळे टीम इंडियात निवडण्यात आलं. त्याच दबावाखाली त्याला उपकर्णधार बनवण्यात आलं. हे समजू शकलेलं नाहीय की, भारतीय टीममध्ये सिलेक्टर्स आणि कॅप्टनवर कोणाचा दबाव होता? आता भीती ही आहे की, दबावाखाली घेतलेल्या या निर्णयाचा फटका टीम इंडियाला T20 वर्ल्ड कपमध्ये तर बसणार नाही ना?

या दुराव्याचा परिणाम दिसलाय

IPL 2024 मध्ये रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यामधील या दुराव्याचा परिणाम दिसून आलाय. 5 वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली. आता T20 वर्ल्ड कपमध्ये असच झालं, तर कोट्यावधी भारतीय क्रिकेट फॅन्स निराश होतील.