T20 World cup | रोहित शर्मा आणि विराट कोहलीमुळे टीम इंडियाच्या 3 खेळाडूंना धोका निर्माण झालाय. कारण या दोघांमुळे तीन युवा खेळाडूंचा पत्ता कट होऊ शकतो. हे तीन युवा प्लेयर T20 वर्ल्ड कप टीममधून आपल स्थान गमावू शकतात, हा त्यांच्यासाठी मोठा धोका आहे. कारण या तीन युवा खेळाडूंनी चांगला परफॉर्मन्स दिला, तरी रोहित-विराटचा अनुभव त्यापेक्षा मोठा आहे. त्यामुळे या तीन खेळाडूंना संघातील आपल स्थान गमवाव लागेल. आता प्रश्न हा आहे की, हे तीन खेळाडू कोण आहेत?, ज्यांच्यावर रोहित-विराटमुळे T20 वर्ल्ड कप टीममधून बाहेर होण्याचा धोका आहे. यात ऋतुराज गायकवाड़, तिलक वर्मा आणि इशान किशन हे प्लेयर आहेत.
या तीन खेळाडूंसाठी रोहित-विराट कसा अडथळा ठरु शकतात? त्यासाठी तुम्हाला बॅटिंग ऑर्डर पाहावी लागेल. अन्य खेळाडू सध्या ज्या क्रमांकावर खेळतात, त्यावर रोहित आणि विराटचा पहिल्यापासून दबदबा आहे. अशावेळी हे दोन सिनिअर प्लेयर टीममध्ये असतील, दुसऱ्या खेळाडूंना बाहेर बसायचच आहे.
महाराष्ट्रातील प्लेयरला बसू शकतो फटका
ऋतुराज गायकवाड ओपनिंगला येतो. त्याचप्रमाणे रोहित शर्मा सुद्धा ओपन करतो. रोहित प्लेइंग 11 चा भाग असेल, तर सहाजिकच ओपनिंगसाठी पहिली संधी त्याला मिळेल. रोहितचा जोडीदार कोण असावा? त्यासाठी टीम मॅनेजमेंटची पसंती शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल याच्यापैकी एकाला असेल. त्यात ऋतुराज गायकवाड फिट बसत नाही.
त्या जागेवर टीम मॅनेजमेंटकडे केएल राहुलचा पर्याय
इशान किशनची सुद्धा तिच स्थिती आहे. तो सुद्धा ओपनिंग करतो. सध्या तो टीमच्या बाहेर आहे. याआधी टीममध्ये असताना तो प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. अफगाणिस्तान विरुद्धच्या सीरीजमध्ये रोहित शर्मा ओपनिंगला यायचा. अशावेळी यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल टीममध्ये असताना इशान किशनला संधी मिळण्याचा प्रश्नच नाही येतं. ओपनिंग ऐवजी मधल्याफळीत इशान किशनचा विचार केला, तर तिथे टीम मॅनेजमेंटकडे केएल राहुलचा पर्याय आहे.
विराटमुळे त्याला जागा सोडावी लागली
तिलक वर्मा मोहालीमध्ये अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात टीमचा भाग होता. इंदोरमध्ये विराट कोहली दुसऱ्या T20 सामन्यासाठी टीममध्ये येताच त्याला आपली जागा सोडावी लागेल. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, विराट खेळणार असेल, तर तिलक वर्माला T20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये स्थान मिळण कठीण आहे.