ढाका: टीम इंडिया बांग्लादेश दौऱ्यावर आहे. दोन्ही टीम्समध्ये पहिला वनडे सामना सुरु आहे. आज रोहित शर्मा आणि शिखर धवन ही जोडी बऱ्याच कालावधीनंतर मैदानात एकत्र उतरली. मागच्या काही महिन्यात रोहित वनडे सामने कमी खेळला. त्याचं सर्व लक्ष टी 20 वर्ल्ड कपवर होतं. रोहित-धवनची जोडी शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर मैदानात उतरली, त्यावेळी रोहित चिडलेला दिसला.
किती वर्षानंतर बांग्लादेशचा दौरा?
टीम इंडिया सात वर्षानंतर बांग्लादेश दौऱ्यावर आली आहे. याआधी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बांग्लादेश दौरा केला होता. आजच्या मॅचमध्ये कॅप्टन लिट्टन दासने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, टीम इंडियाला फलंदाजीसाठी निमंत्रित केलं. पण मॅच सुरु होण्याआधी रोहितच्या चेहऱ्यावर राग दिसला.
रोहितला राग का आला?
इनिंगचा पहिला चेंडू रोहित खेळणार होता. पण मॅच सुरु व्हायला उशिर होत होता. रोहितला वाट पहावी लागली. त्यामुळे त्याचा मूड खराब झाला. दुसऱ्याटोकाला धवन अंपायर्सशी बोलत होता. मॅच सुरु व्हायला का विलंब होतोय? कदाचित हेच विचारत असावा.
अंपायर्स घड्याळ बघत होते
टीम इंडियाचे दोन्ही ओपनर्स ठरलेल्या वेळेच्या पाच मिनिटं आधी क्रीजवर आले होते. त्यावेळी अंपायर्स स्थानिक वेळेनुसार 12 कधी वाजणार? त्यासाठी घड्याळ पाहत होते. त्यामुळे रोहित-धवनच्या जोडीला वाट पहावी लागली. रोहित आणि धवन या दरम्यान परस्परांशी बोलत होते. कॅमेरा रोहितच्या चेहऱ्यावर आला त्यावेळी तो चिडलेला दिसत होता.
— Guess Karo (@KuchNahiUkhada) December 4, 2022
टीम इंडियाचे फलंदाज फेल
41.2 ओव्हर्समध्ये टीम इंडियाचा डाव 186 धावांवर संपुष्टात आला. शाकीब अल हसन आणि इबादत होसेन या दोन गोलंदाजांनी टीम इंडियाची वाट लावली. शाकीबने 10 ओव्हर्समध्ये 36 धावा देऊन 5 आणि इबादतने 8.2 ओव्हर्समध्ये 47 धावा देऊन 4 विकेट काढल्या. टीम इंडियाकडून फक्त केएल राहुलने सर्वाधिक 73 धावा केल्या. अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले.