वर्ल्ड कपसाठी Rohit Sharma, टीम इंडियाला त्याची नितांत गरज, श्रीलंकेच्या दिग्गज क्रिकेटपटूच निरीक्षण

| Updated on: Mar 26, 2023 | 1:11 PM

Team India : श्रीलंकेच्या दिग्गज क्रिकेटपटूने टीम इंडियाच्या एका खेळाडूबद्दल महत्वाच निरीक्षण नोंदवल आहे. भारतात होणारा वनडे वर्ल्ड कप 2023 जिंकण्यासाठी टीम इंडियाला त्याची नितांत गरज आहे.

वर्ल्ड कपसाठी Rohit Sharma, टीम इंडियाला त्याची नितांत गरज, श्रीलंकेच्या दिग्गज क्रिकेटपटूच निरीक्षण
Rohit Sharma
Image Credit source: PTI
Follow us on

नवी दिल्ली : यंदाची वनडे वर्ल्ड कप स्पर्धा भारतात होणार आहे. 2023 चा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी योग्य टीम निवड आवश्यक आहे. त्यासाठी कॅप्टन रोहित शर्मा, हेड कोच राहुल द्रविड आणि टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने संघ बांधणीवर लक्ष केंद्रीत केलय. टीम इंडियाने याआधी शेवटची ICC ट्रॉफी 2013 मध्ये जिंकली होती. चॅम्पियन ट्रॉफीच विजेतेपद भारताने मिळवलं होतं. त्यानंतर टीम इंडियाला उपविजेतेपद किंवा अंतिम चारमध्ये समाधान मानाव लागलय. 2021 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं होतं.

मागच्यावर्षी T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच आव्हान संपुष्टात आलं होतं. वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लिश टीमने टीम इंडियाचा 10 विकेटने दारुण पराभव केला होता. 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने 16 ओव्हरमध्येच विजयी लक्ष्य गाठलं होतं. जोस बटलरने नाबाद 80 आणि हेल्सने नाबाद 86 धावा फटकावल्या होत्या.

टीम इंडियाला त्याची गरज

यंदा भारतच वनडे वर्ल्ड कपचा आयोजक आहे. या स्पर्धेआधी टीम इंडियाला काही झटके बसलेत. स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह मागच्यावर्षीपासून उपलब्ध नाहीय. यंदाच आयपीएल, आशिया कप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला तो मुकणार आहे. विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत रिकव्हरी करतोय. तो एका भीषण अपघातातून बचावला आहे. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू दिलहारा फर्नांडोच्या मते, वनडे वर्ल्ड कपमध्ये जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती टीम इंडियाला प्रकर्षाने जाणवू शकते. रोहित शर्माला जसप्रीत बुमराहची गरज भासेल.

तो अदभूत गोलंदाज

“जसप्रीत बुमराह अदभूत गोलंदाज आहे. तुम्ही मागच्या पाच वर्षातील टीम इंडियाची कामगिरी पाहिली तर, जसप्रीत बुमराहने महत्वाची भूमिका बजावलीय. तो टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीच चांगलं नेतृत्व करतो. तो गेम चेंजर आहे. त्याच्या दुखापतीची मला कल्पना नाहीय. पण तो भारतासाठी वर्ल्ड कपमध्ये महत्वपूर्ण ठरु शकतो. भारताला आणि रोहितला वर्ल्ड कपमध्ये त्याची नितांत गरज भासेल” असं फर्नांडो टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाला.

करिअर धोक्यात टाकयच नाहीय

जसप्रीत बुमराह कधीपर्यंत रिकव्हर होणार? हा भारतीय क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय असून ठामपणे त्या बद्दल कोणीच सांगू शकत नाही. दोनदा त्याच्या पुनरागमनाची घाई करण्याचा फटका बसला. बीसीसीआयला जसप्रीत बुमराहच करिअर धोक्यात टाकयच नाहीय. काही आठवड्यांपूर्वी न्यूझीलंडमध्ये त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली. NCA कडून बुमराहच्या रिकव्हरीवर लक्ष ठेवलं जातय.