पर्थ: टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2022 ची चांगली सुरुवात केली आहे. टीम इंडियाने आपले पहिले दोन्ही सामने जिंकले. पाकिस्तान आणि नेदरलँडवर विजय मिळवला. आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना सुरु आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाची स्थिती खराब आहे. पण भारताचा कॅप्टन रोहित शर्माने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
रोहितने श्रीलंकेच्या कुठल्या खेळाडूला मागे टाकलं?
रोहितचा टी 20 वर्ल्ड कपमधला हा 36 वा सामना आहे. आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळून वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकॉर्ड रोहितच्या नावावर झाला. रोहितने श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानला मागे टाकलं. श्रीलंकेचा माजी कर्णधार टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 35 सामने खेळला आहे. रोहितने मागच्या सामन्यात दिलशानची बरोबरी केली होती. आज त्याने दिलशानला मागे टाकलं.
ते तीन प्लेयर कोण?
रोहित आणि दिलशाननंतर टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे तीन खेळाडू आहेत. पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी, वेस्ट इंडिजा ड्वेयन ब्राव्हो आणि शोएब मलिक यांनी टी 20 वर्ल्ड कपमध्ये प्रत्येकी 34 सामने खेळलेत.
धोनी किती सामने खेळलाय?
भारताचा माजी कर्णधार आणि भारताला पहिला टी 20 वर्ल्ड कप जिंकून देणारा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल, बांग्लादेशचा मुस्फिकुर रहीम यांनी प्रत्येकी 33 सामने खेळलेत. महेला जयवर्धने आणि लसिथ मलिंगा प्रत्येकी 31 सामने खेळलेत.