IND VS SL: ‘मी चढ-उतार बघितलेत, त्यामुळे मी…’, विराटच्या 100 व्या कसोटीआधी रोहितने सांगितली महत्त्वाची गोष्ट

| Updated on: Mar 03, 2022 | 4:32 PM

IND VS SL: भारत आणि श्रीलंकेत (India vs Srilanka) मोहालीमध्ये खेळला जाणारा कसोटी (Mohali Test) सामना विराट कोहलीच नाही, तर रोहित शर्मासाठी (Rohi sharma) सुद्धा खास आहे.

IND VS SL: मी चढ-उतार बघितलेत, त्यामुळे मी..., विराटच्या 100 व्या कसोटीआधी रोहितने सांगितली महत्त्वाची गोष्ट
Image Credit source: bcci twitter
Follow us on

चंदीगड: भारत आणि श्रीलंकेत (India vs Srilanka) मोहालीमध्ये खेळला जाणारा कसोटी (Mohali Test) सामना विराट कोहलीच नाही, तर रोहित शर्मासाठी (Rohi sharma) सुद्धा खास आहे. उद्या विराट मैदानावर 100 वा कसोटी सामना खेळण्यासाठी उतरेल, त्यावेळी कॅप्टन म्हणून रोहितची पहिली टेस्ट मॅच असेल. रोहित शर्माने मोहाली कसोटीआधी पत्रकारांशी चर्चा केली. रोहितला पत्रकारांनी आतापर्यंत 40 च्या आसापास कसोटी सामने खेळण्याबद्दल प्रश्न विचारला. तू आता कॅप्टन आहेस, त्यामुळे स्वत:साठी काय टार्गेट सेट केलस? असा प्रश्न विचारला. त्यावर रोहितने मी 40 कसोटी सामने खेळूनही खूश असल्याचं सांगितलं.

मी स्वत:साठी काय टार्गेट सेट करु

“मी स्वत:साठी काय टार्गेट सेट करु. आता मी संघाचाच विचार करतोय. मी 40 कसोटी सामने खेळून खूश आहे. मला अनेकदा दुखापत झाली आहे. मी चढ-उतार बघितलेत. मला हे करायचय किंवा ते करायचय याचा विचार करत नाही. आता मी फक्त कर्णधारपदाचा विचार करतोय. मला फक्त टीमसाठी चांगलं करायचं आहे” असं रोहित म्हणाला.

टेस्टमध्ये काय रणनिती असणार?

“कसोटीमध्ये कॅप्टनशिप एक वेगळं आव्हान आहे. टेस्ट क्रिकेट वनडे आणि टी 20 पेक्षा वेगळं क्रिकेट आहे. पण कर्णधार म्हणून माझा तोच विचार आहे. कसोटीतही परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. कसोटीत प्रत्येकदिवशी परिस्थिती बदलते, त्यानुसारच रणनिती बनवावी लागेल” असं रोहित म्हणाला. “मी जास्त पुढचा विचार करत नाही. मी पहिल्यांदा कसोटी कर्णधारपद भूषवतोय, त्यामुळे आव्हान तर आहेच. रणजीमध्ये कर्णधारपद भूषवलं आहे. पण हे वेगळं आव्हान असून मी तयार आहे” असं रोहित म्हणाला.

प्रतिस्पर्ध्याचा इतका विचार करत नाही

“मी प्रतिस्पर्धी संघाचा जास्त विचार करत नाही. प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज-गोलंदाजाला मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण संघाने काय प्रदर्शन केलय, किती सामने जिंकलेत याचा विचार करत नाही” असं रोहित म्हणाला. “मी प्रतिस्पर्धी संघाचा इतका विचार करत नाही. आपल्या संघासाठी जे करायचं आहे, ते करणं आवश्यक आहे” असं रोहित म्हणाला.

rohit sharma captaincy debut virat kohli 100th test india vs sri lanka mohali