हैदराबाद: टीम इंडियाचा गत वर्षातील शेवटच्या वनडे सीरीजमध्ये पराभव झाला. बांग्लादेशने टीम इंडियाला 2-1 असं पराभूत केलं. पण टीम इंडियाने नव्या वर्षाची दमदार सुरुवात केली. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये क्लीन स्वीप केलं. 3-0 ने सीरीज जिंकली. श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचे फलंदाज थोडे अडखळले. पण केएल राहुलच्या संयमी खेळीमुळे टीम इंडियाने दुसरा सामनाही सहज जिंकला.
सलामीच्या जागेसाठी तो प्रबळ दावेदार
अंगठ्याला झालेल्या दुखापतीनंतर रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या सीरीजमधून पुनरागमन केलं. तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. विराट कोहली सुद्धा फॉर्ममध्ये आहे. त्याने दोन शतक झळकावलीत. इशान किशनच्या जागी शुभमन गिलला संधी दिली. त्याने सुद्धा सलामीच्या जागेसाठी योग्य दावेदार असल्याच सिद्ध केलय. शुभमन गिलने एक शतक आणि अर्धशतक झळकावलं. तिरुअनंतपूरममध्य शुभमन गिलने सेंच्युरी ठोकली. त्यामुळे आजपासून न्यूझीलंड विरुद्ध सुरु होत असलेल्या सीरीजमध्ये तो सलामीच्या जागेसाठी प्रबळ दावेदार आहे.
स्फोटक बॅट्समनला संधी
न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरीजआधी रोहित शर्माने पत्रकार परिषदेत एक गोष्ट स्पष्ट केलीय. इशान किशनला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये संधी मिळाली नाही. पण न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत त्याचा टीममध्ये समावेश केला जाईल. फक्त त्याची बॅटिंग पोजिशन बदलली जाणार आहे.
इशान किशन न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात मीडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करताना दिसेल. बांग्लादेश विरुद्धच्या दमदार कामगिरीनंतर त्याला इथे संधी मिळेल, याचा आनंद आहे असं रोहित शर्मा म्हणाला.
बांग्लादेश विरुद्ध शेवटच्या वनडेत दिसला
बांग्लादेश विरुद्ध शेवटच्या तिसऱ्या वनडेमध्ये इशान किशनने डबल सेंच्युरी झळकवली होती. सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा यांच्यानंतर डबल सेंच्युरी झळकवणारा इशान चौथा भारतीय फलंदाज आहे. बांग्लादेश विरुद्ध इशानने 131 चेंडूत 210 धावांची खेळी केली होती.
श्रेयस सीरीजमधून बाहेर
बांग्लादेश विरुद्धच्या शेवटच्या वनडेनंतर इशान पुन्हा वनडे खेळताना दिसला नाही. त्यावर फॅन्श आणि क्रिकेटच्या जाणकारांनी जोरदार टीका केली. आता इशानला मिडल ऑर्डरमध्ये संधी मिळणार आहे. तिथे तो कशी बॅटिंग करतो, याची उत्सुक्ता आहे. कारण त्याला सलामीला खेळण्याची संधी आहे. कदाचित त्याला त्याच्या आक्रमक बॅटिंगला आवर घालावा लागेल. टीमच्या गरजेनुसार बॅटिंग करावी लागेल. श्रेयस अय्यरच्या जागी इशान बॅटिंगला येईल. पाठिच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर या सीरीजमध्ये खेळणार नाहीय.
रोहित शर्मा काय म्हणाला?
“टीम म्हणून आम्हाला आमच्या कामगिरीत सुधारणा करायची आहे. समोर मोठी टीम आहे, मोठ चॅलेंज आहे. आम्हाला स्वत:लाच चॅलेंज करुन टीम म्हणून काही गोष्टी मिळवायच्या आहेत. न्यूझीलंड एक चांगली टीम आहे. पाकिस्तान विरुद्ध त्यांनी चांगला विजय मिळवलाय. सहाजिकच ते चांगलं क्रिकेट खेळतील” असं कॅप्टन रोहित शर्मा म्हणाला.