T20 वर्ल्ड कप 2024 ची फायनल जिंकल्यानंतर रोहित शर्मााने लगेचच या फॉर्मेटमधून रिटायरमेंटची घोषणा केली. त्यानंतर टीम इंडियाचा पुढचा कॅप्टन कोण होणार? याची चर्चा सुरु झाली. या शर्यतीत हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव हे दोन मोठे दावेदार आहेत. श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडिया तीन T20 सामने खेळणार आहे. बीसीसीआयने या फॉर्मेटसाठी स्थायी कॅप्टन निवडण्यासाठी मंथन सुरु केलय. टीम इंडियाचे नवनियुक्त कोच गौतम गंभीर यांनी या पदासाठी सूर्यकुमार यादवला पसंती दिल्याची बातमी होती. आता नव्या रिपोर्ट्नुसार, रिटायर झालेल्या रोहित शर्माने सुद्धा कॅप्टनशिपच्या पदासाठी सूर्यकुमार यादवला आपली पसंती दिलीय.
टीम इंडियाचे नवीन हेड कोच म्हणून गौतम गंभीर यांची नियुक्ती झाली आहे. रोहित शर्मा रिटायर झाल्यापासून T20 साठी नवीन कॅप्टनचा शोध सुरु आहे. टीम इंडियाचा नुकताच झिम्बाब्वे दौरा झाला. या दौऱ्यासाठी शुभमन गिलला कॅप्टन बनवण्यात आलं होतं. त्याला फक्त याच टूरसाठी कॅप्टन बनवण्यात आलं होतं. बीसीसीआयला या प्रश्नाच पुढच्या काही वर्षांसाठी उत्तर हवं आहे. त्यासाठी त्यांनी हेड कोच गौतम गंभीर आणि माजी कॅप्टन रोहित शर्माचा सल्ला मागितलेला. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्नुसार दोघांनी सूर्यकुमार यादवच्या बाजूने आपल मत व्यक्त केलं. याचाच अर्थ असा आहे की, रोहित शर्मामुळे हार्दिक पांड्या टीम इंडियाचा कॅप्टन बनू शकणार नाही.
हार्दिकच्या कॅप्टनशिपला विरोध का?
हार्दिक पांड्याला टीम इंडियाच कॅप्टन न बनवण्यामागे मुख्य कारण त्याची दुखापत आहे. मागच्या काही वर्षात हे दिसून आलय की, दुखापतीमुळे हार्दिक पांड्या अनेक सीरीजना मुकला आहे. त्याचं वर्कलोड मॅनेजमेंट टीमसाठी एक मोठ आव्हान ठरतं. हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवलं, तरी टीमला नेहमी नव्या कॅप्टनची आवश्यकता भासणार. बीसीसीआयला कॅप्टनशिपसाठी दीर्घकालीन पर्याय हवा आहे. सूर्याच प्रदर्शन हा सुद्धा एक फॅक्टर आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवला फक्त श्रीलंका दौऱ्यासाठी नाही, तर 2026 T20 वर्ल्ड कप पर्यंत कॅप्टन बनवलं जाऊ शकतं.
हार्दिक VS सूर्यकुमार
T20 इंटरनॅशनलमधील कॅप्टनशिपबद्दल बोलायच झाल्यास सूर्याचा रेकॉर्ड हार्दिकवर भारी आहे. हार्दिकने आतापर्यंत 16 T20 इंटरनॅशनलमध्ये टीम इंडियाच नेतृत्व केलय. यात 10 सामने जिंकलेत. 5 मॅचमध्ये पराभव झालाय. एक सामना टाय झालेला. दुसऱ्याबाजूला सूर्यकुमार यादवने 7 T20 सामन्यात नेतृत्व केलय. यात 5 मॅचमध्ये विजय मिळवला, 2 सामन्यात पराभव झाला. विनिंग पर्सेन्टेजच्या हिशोबाने सूर्याच पारडं जड आहे.
टीम इंडियाचा श्रीलंका दौरा कधीपासून?
टीम इंडियाचा श्रीलंका दौरा 27 जुलैपासून सुरु होतोय. या दौऱ्यावर टीम इंडिया T20 सीरीज खेळणार आहे. 27 जुलै ते 30 जुलै असं सीरीजच वेळापत्रक आहे. भारत श्रीलंकेत 3 T20 सामने खेळणार आहे.