मुंबई: टीम इंडिया (Team India) सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे. तिथे आयसीसी टी 20 वर्ल्ड कपची (T20 World cup) तयारी सुरु आहे. वाकामध्ये टीम इंडियाचा सराव सुरु आहे. आज सरावाला उतरण्याआधी रोहित शर्माला (Rohit Sharma) तिथे क्रिकेट खेळणाऱ्या एका लहान मुलाने प्रभावित केलं. रोहितने त्या मुलाला थेट नेटमध्ये बोलावल व त्याला गोलंदाजी करायला लावली. बीसीसीआयने तो व्हिडिओ आपल्या वेबसाइटवर पोस्ट केलाय. द्रुर्शिल चौहान त्या मुलाच नाव आहे. त्याच वय 11 वर्ष आहे. रोहित या लहान मुलाच्या गोलंदाजी Action ने प्रभावित झाला.
दोन सराव सामन्यांचा निकाल काय?
टीम इंडिया आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये 23 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. या आधी टीम इंडियाने दोन सराव सामने खेळले. दोन्ही सामने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळले. एका मॅचमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला, तर दुसऱ्या मॅचमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला.
रोहितने नेट्समध्ये दिली संधी
टीम इंडिया आज सरावसाठी मैदानात दाखल झाली. त्यावेळी तिथे काही मुलं क्रिकेट खेळत होती. यात एक लहान मुलगा डावखुरा वेगवान गोलंदाज होता. रोहितने जेव्हा या छोट्या मुलाची गोलंदाजी पाहिली, तेव्हा तो प्रभावित झाला. त्याला या मुलाची गोलंदाजीची Action प्रचंड आवडली. रोहितने त्या मुलाला बोलावलं. रोहित त्या मुलाला आपल्यासोबत नेट्समध्ये घेऊन गेला व त्याला गोलंदाजी करायला लावली.
एनलिस्ट हरि प्रसाद मोहन यांनी काय सांगितलं?
टीम एनलिस्ट हरि प्रसाद मोहन यांनी सांगितलं की, “आम्ही आज दुपारी सेशनसाठी वाकामध्ये पोहोचलो. तिथे मुलांची सकाळच्या सत्रातील प्रॅक्टिस संपणार होती. आम्ही ड्रेसिंग रुममध्ये गेलो. तिथून 100 मुल सराव करताना दिसली. तिथे एक मुलगा होता, ज्याने सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं”
त्या मुलाने टीम इंडियाचा ड्रेसिंग रुम पाहिला
त्या मुलाच्या गोलंदाजी Action ने सर्वांनाच प्रभावित केलं. त्याची Action खूप स्मूथ होती. तो फलंदाजांना सतत बीट करत होता. रोहितने त्या मुलाला बोलवून घेतलं व त्याला गोलंदाजी करायला लावली. रोहित नेट्समध्ये या मुलाची गोलंदाजी खेळला. त्या मुलाने टीम इंडियाचा ड्रेसिंग रुम पाहिला. अन्य खेळाडूंशी चर्चा केली. रोहितने या मुलाला आपली ऑटोग्राफही दिली.