ढाका: टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला सध्या नशिबाची साथ मिळत नाहीय. त्याची बॅट आणि कॅप्टनशिप दोन्ही चालत नाहीय. बांग्लादेश विरुद्ध दुसऱ्या वनडेत त्याला दुखापत झाली. बांग्लादेशच्या इनिंगमध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याच्यासोबत ही दुर्घटना घडली. मोहम्मद सिराजच्या चेंडूवर एनामुल हकने शॉट मारला. चेंडू स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या हातात गेला. पण या दरम्यान त्याच्या बोटाला दुखापत झाली. बोटातून रक्त येऊ लागलं. रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्माला रुग्णालयात नेण्यात आलय. तिथे त्याचा एक्स-रे काढण्यात येईल.
कॅच सोडली म्हणून नुकसान झालं नाही, कारण…
रोहित शर्माच्या बोटातून रक्त आलं आणि त्याच्या हातातून कॅचही सुटली. रोहित शर्मा या दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. रोहितची दुखापत गंभीर असेल, तर त्याच तिसऱ्या वनडेमध्ये खेळणं कठीण आहे. रोहित शर्माने कॅच सोडली, म्हणून नुकसान झालं नाही. सिराजने पुढच्याच चेंडूवर एनामुल हकला LBW आऊट केलं.
रोहित शर्मा टॉस हरला
ढाकामध्ये दुसरा वनडे सामना सुरु आहे. बांग्लादेशने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा सलग दुसऱ्या वनडेमध्ये टॉस हरला. टीम इंडिया पहिला वनडे सामना एक विकेटने हरली होती. टीम इंडियासाठी दुसरा वनडे सामना करो या मरो आहे. या मॅचमध्ये पराभव झाल्यास, सीरीज हातातून निसटेल. त्यामुळे टीम इंडियासाठी दुसरा वनडे सामना जिंकण महत्त्वाच आहे.
pic.twitter.com/SoOLqQYLn1#RohitSharma
— Shivam Rajvanshi (@social_timepass) December 7, 2022
भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल
पहिल्या वनेडतील पराभवानंतर टीम इंडियाने दुसऱ्या मॅचसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. अक्षर पटेलचा टीममध्ये समावेश केलाय. कुलदीप सेनच्या जागी उमरान मलिकला संधी दिलीय. अक्षरला शाहबाजच्या जागी संधी मिळालीय.
भारताची प्लेइंग इलेव्हन-रोहित शर्मा, (कॅप्टन) शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, मोहम्मद सिराज और उमरान मलिक.