Rohit Sharma | ISRO चीफ प्रमाणे रोहित शर्माच सुद्धा ‘या’ मंदिराशी खास कनेक्शन

| Updated on: Aug 26, 2023 | 1:42 PM

Rohit Sharma | इस्रोच्या प्रमुखांनी लॉन्चच्या एक दिवस आधी या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं. रोहित शर्माही आता वर्ल्ड कप 2023 मध्ये इतिहास रचणार असं वाटू लागलय.

Rohit Sharma | ISRO चीफ प्रमाणे रोहित शर्माच सुद्धा या मंदिराशी खास कनेक्शन
Rohit-Sharma टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने कर्णधार रोहित शर्माबाबत मोठी भविष्यवाणी केलीये.
Follow us on

मुंबई : भारत चंद्रावर पोहोचलाय. इस्रोच्या वैज्ञानिकांनी संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत पहिला देश ठरलाय. चांद्रयानच्या यशानंतर इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांची चर्चा आहे. सोमनाथ यांच्यानंतर आता भारताला रोहित शर्माकडून असं यश अपेक्षित आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये वर्ल्ड कप स्पर्धा सुरु होत आहे. भारताने यंदाचा वर्ल्ड कप जिंकावा अशी तमाम देशवासियांची इच्छा आहे. वर्ल्ड कपला आता दीड महिन्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. टीम इंडियाची जोरात तयारी सुरु आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम मैदानात उतरेल. मागच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये रोहितने धावांचा पाऊस पाडला होता. पुन्हा एकदा रोहितच्या बॅटमधून धावांचा पाऊस अपेक्षित आहे. इस्रो चीफच यश पाहून रोहितने सुद्धा भारताला आता असं यश मिळवून द्याव अशी देशवासियांची इच्छा आहे.


दोघांच या मंदिराशी खास कनेक्शन

सोमनाथ आणि भारतीय कॅप्टन रोहित शर्मा यांचं तिरुपती मंदिराशी खास कनेक्शन आहे. त्यामुळेच रोहित शर्मा वर्ल्ड कपमध्ये यशस्वी होण्याची शक्यता वाढली आहे. रोहित आणि सोमनाथ दोघांनी तिरुपती मंदिरात दर्शन घेतलय.


सगळ्यांच्या नजरा रोहित शर्मावर

इस्रो प्रमुख सोमनाथ चांद्रयान-3 लॉन्चच्या एकदिवसआधी आपल्या टीमसोबत तिरुपती मंदिरात गेले होते. त्यानंतर त्यांच्या टीमने इतिहास रचला. सोमनाथ यांच्या टीमने जी कमाल केली, त्याकडे आज सगळ जग पाहतय. आता सगळ्यांच्या नजरा रोहित शर्मावर आहेत. काही दिवसांपूर्वी पत्नी रितिकासोबत तो तिरुपती मंदिरात दर्शनासाठी गेला होता. आधी आशिया कप आणि त्यानंतर वर्ल्ड कप 2023 मध्ये अभियान सुरु करेल.