IND vs BAN: ‘Rohit Sharma ला सांगा, आता घरी बस’, प्रसिद्ध क्रिकेटपटूच खळबळजनक वक्तव्य

| Updated on: Dec 18, 2022 | 2:44 PM

IND vs BAN: 'या' क्रिकेटरने रोहित शर्माबद्दल असं विधान केलं, त्यामागे कारण काय....

IND vs BAN: Rohit Sharma ला सांगा, आता घरी बस, प्रसिद्ध क्रिकेटपटूच खळबळजनक वक्तव्य
Follow us on

ढाका: अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा चट्टोग्राम कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. वनडे सीरीजच्या दुसऱ्या सामन्यात रोहितला ही दुखापत झाली होती. रोहित शर्मा आता या दुखापतीमधून सावरला आहे. बांग्लादेश विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित खेळताना दिसू शकतो. मीरपूर येथे येत्या 22 डिसेंबरपासून दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. रोहित दुसऱ्या सामन्यात खेळणार असेल, तर त्यामुळे टीम मॅनेजमेंटच्या अडचणी वाढू शकतात. कारण पहिल्या कसोटीत शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी जबरदस्त शतक झळकावली. रोहित टीममध्ये परतणार असेल, तर बाहेर कोण बसणार? या प्रश्नावर माजी क्रिकेटपटू अजय जाडेजा याने अजब उत्तर दिलं.

….तो, पर्यंत शुभमन गिल शर्यतीतच नव्हता

शुभमन गिल प्लेइंग इलेव्हनच्या शर्यतीतच नव्हता. रोहित शर्माला दुखापत झाल्यानंतर शुभमन गिलला संधी निर्माण झाली. शुभमन गिलने या कसोटी सामन्यात आपल्या करिअरमधील पहिलं शतक झळकावलं. आज रविवारी टीम इंडियाने चट्टोग्राम कसोटी सामना 188 धावांनी जिंकला.

पुजाराच वेगवान शतक

गिलशिवाय चेतेश्वर पुजाराने सुद्धा या टेस्टमध्ये शतक ठोकलं. त्यामुळे टीम इंडियाला बांग्लादेशसमोर 513 रन्सच विशाल लक्ष्य ठेवता आलं. मागच्या 52 इनिंगमधील पुजाराच हे पहिलं आणि वेगवान शतक आहे.

जाडेजाचा सल्ला काय?

रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीत खेळणार असेल, तर दुर्देवाने कॅप्टनला जागा करुन देण्यासाठी शुभमन गिलला बाहेर बसाव लागेल. चेतेश्वर पुजाराने शतक झळकावलं नसतं, तर कदाचित त्याच्याजागी टीम मॅनेजमेंटने शुभमनलाच संधी दिली असती. रोहित सध्या रिहॅब प्रोसेसमध्ये आहे, त्यामुळे त्याने NCA मध्ये थांबाव, असं जाडेजा म्हणाले.

जेव्हा एखाद्या खेळाडूचा हात फ्रॅक्चर होतो, तेव्हा…

“जेव्हा एखाद्या खेळाडूचा हात फ्रॅक्चर होतो आणि तुम्ही 10 दिवस बॅट पकडू शकत नाही. तुम्ही रिकव्हर झालात, तरी तुम्ही दुसऱ्यादिवशी टीमचा भाग बनू शकत नाही. त्याला पुढचे 15 दिवस थांबाव लागतं. दुखापत कितपत गंभीर आहे, हे सुद्धा आपल्याला माहित नाहीय. म्हणूनच मी हा सल्ला दिलाय. आपण तात्पुरतात तोडगा शोधतोय. म्हणूनच मी रोहितला घरी बसायला सांगतोय” असं अजय जाडेजा सोनी स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाला. दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.