स्वत:च्या देशाची टीम सोडली, आता रोहित शर्माला साथ देणार ‘हा’ दिग्गज खेळाडू, मिळणार कोट्यवधी रुपये

| Updated on: Sep 16, 2022 | 12:30 PM

पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. सर्वच टीम्सनी या टुर्नामेंटसाठी कंबर कसली आहे.

स्वत:च्या देशाची टीम सोडली, आता रोहित शर्माला साथ देणार हा दिग्गज खेळाडू, मिळणार कोट्यवधी रुपये
Rohit sharma
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई: पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. सर्वच टीम्सनी या टुर्नामेंटसाठी कंबर कसली आहे. T20 वर्ल्ड कपआधी दक्षिण आफ्रिकेच्या टीमला मोठा झटका बसला आहे. त्यांचे मुख्य हेड कोच मार्क बाऊचर यांनी दक्षिण आफ्रिकन टीमची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय. ते रोहित शर्माची साथ देणार आहेत. आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम मुंबई इंडियन्सने शुक्रवारी या वृत्ताला दुजोरा दिला.

दक्षिण आफ्रिकेचे माजी विकेटकीपर फलंदाज मार्क बाऊचर मुंबई इंडियन्स टीमचे हेड कोच असणार आहेत. बाऊचर माहेला जयवर्धनेची जागा घेणार आहेत. ते आधी मुंबई इंडियन्सचे हेड कोच होते.

कधी हेडकोच पदी नियुक्ती केली?

आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सची टीम बाऊचर यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करणार आहे. टी 20 वर्ल्ड कपनंतर मार्क बाऊचर आपलं पद सोडतील, असं दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने सांगितलं आहे. 2019 साली दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने मार्क बाऊचर यांची हेड कोचपदी नियुक्ती केली होती.

वर्षभर आधीच सोडली साथ

त्यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या टीमने 11 टेस्ट, 12 वनडे आणि 23 T20 सामन्यांमध्ये विजय मिळवला. आफ्रिकेने बाऊचर यांच्यासोबत 4 वर्षांचा करार केला होता. पुढच्यावर्षी 2023 साली भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपपर्यंत हा करार होता. पण त्याआधीच बाऊचर यांनी दक्षिण आफ्रिकेची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय.

2 सीजनमध्ये मुंबईची खराब कामगिरी

मुंबई इंडियन्सचं मुख्य कोच बनणं ही सन्मानाची बाब आहे, असं मार्क बाऊचरने म्हटलय. मुंबई इंडियन्सच्या टीमने आयपीएलमध्ये पाच वेळा विजेतेपद मिळवलं. पण मागच्या दोन सीजनमध्ये त्यांनी खूपच खराब प्रदर्शन केलं. 2021 मध्ये टीम पाचव्या स्थानावर होती. या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सची टीम तळाला होती. रोहितच्या टीमचा 2022 च्या सीजनमध्ये 10 सामन्यात पराभव झाला. टीमला अवघे 4 सामने जिंकता आले.