IND vs SL: रोहित शर्मा T 20 चा नवीन किंग, विराटसोबत मोठ-मोठ्या धुरंधरांना टाकलं मागे, रचना नवीन रेकॉर्ड

| Updated on: Feb 24, 2022 | 9:49 PM

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी (Rohit sharma) सध्या क्रिकेटच्या मैदानावर सगळं काही मनासारखं घडतय. तिन्ही फॉर्मेटमध्ये भारताचं कर्णधारपद त्याला मिळालय.

1 / 4
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी सध्या क्रिकेटच्या मैदानावर सगळं काही मनासारखं घडतय. तिन्ही फॉर्मेटमध्ये भारताचं कर्णधारपद त्याला मिळालय. वनडे आणि टी 20 मध्ये भारताला सातत्याने विजय मिळतोय. त्याशिवाय रोहित आपल्या बॅटनेही कमाल दाखवतोय. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. (Photo: BCCI)

2 / 4
रोहितने लखनऊमध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात हा रेकॉर्ड केला. रोहितने न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज मार्टिन गुप्टिल आणि विराट कोहलीला मागे टाकलं व सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावावर केला. रोहितच्या नावावर आता 123 सामन्यात 115 डावात 3307 धावा आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 140 आहे. (Photo: BCCI)

3 / 4
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत गुप्टिल, कोहली आणि रोहितमध्ये स्पर्धा आहे. रोहित नंतर दुसऱ्या स्थानावर गुप्टिल आहे. त्याने 108 डावात 3299 धावा केल्या आहेत. कोहली 89 डावात 3296 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. (Photo: AFP/BCCI)

4 / 4
श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात रोहितने चांगली फलंदाजी केली. पण त्याचं अर्धशतक हुकलं. त्याने 32 चेंडूत 44 धावा केल्या. यात दोन चौकार आणि एक षटकार होता. त्याने इशान किशनसोबत मिळून पहिल्या विकेटसाठी 111 धावा केल्या. रोहितला लाहिरु कुमाराने क्लीन बोल्ड केल. (Photo: BCCI)