IND VS SL: रोहित शर्मा कॅप्टन म्हणून यशस्वी पण…’त्या’ 15 चेंडूंनी वाढवली चिंता

| Updated on: Feb 24, 2022 | 4:48 PM

रोहित शर्माने (Rohit sharma) नेतृत्वाची धुरा संभाळल्यापासून टीम इंडिया (Team india) विजयी मार्गावर परतली आहे. भारतीय संघात एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

IND VS SL: रोहित शर्मा कॅप्टन म्हणून यशस्वी पण...त्या 15 चेंडूंनी वाढवली चिंता
India vs West Indies: Rohit Sharma Back As Captain, Ravi Bishnoi Earns Maiden Call Up For ODI and T20 Series
Follow us on

नवी दिल्ली: रोहित शर्माने (Rohit sharma) नेतृत्वाची धुरा संभाळल्यापासून टीम इंडिया (Team india) विजयी मार्गावर परतली आहे. भारतीय संघात एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे आणि टी-20 मालिकेत भारताने क्लीनस्वीप केलं आहे. अनेकजण रोहित शर्माच्या कॅप्टनशिपचे कौतुक करत आहेत. वेस्ट इंडिज विरुद्ध (India vs West indies) रोहितने ज्या पद्धतीने आपल्या खेळाडूंचा कौशल्याने वापर केला, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. कर्णधार म्हणून रोहितने स्वत:च नेतृत्व सिद्ध केलं आहे. पण फलंदाज म्हणून रोहित स्वत: संघर्ष करतोय. त्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. रोहित शर्मा कॅप्टन म्हणून यशस्वी असला, तरी मागच्या पाच सामन्यात फलंदाज म्हणून तो अपयशी ठरला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सीरीजमध्ये रोहित विशेष काही करु शकला नाही.

ते 15 चेंडू

वेस्ट इंडिज विरुद्ध शेवटच्या टी-20 सामन्यात फलंदाजी करताना रोहित खूप अडचणीत दिसला. शेवटच्या सामन्यात रोहितने फक्त सात धावा केल्या. त्यासाठी रोहितने 15 चेंडू घेतले. रोहित जे 15 चेंडू खेळला, त्यात तो खूप संघर्ष करताना दिसला. अखेर रॉस्टन चेंजच्या गोलंदाजीवर रोहितचा खेळ संपला.

रोहितचा संघर्ष लवकर थांबला पाहिजे

रोहित शर्माचा फलंदाजीतला हा संघर्ष लवकर थांबला पाहिजे. कारण श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खराब प्रदर्शन त्याला आणि टीम इंडियाला आणखी अडचणीत आणेल. कारण कर्णधार जेव्हा रन्स बनवतो, तेव्हा रणनिती आणखी प्रभावी वाटते. कॅप्टन्स इनिंगमुळे टीममध्येही उत्साह संचारतो. त्यासाठीच रोहितने धावा करणं आवश्यक आहे. मागच्या पाच सामन्यात रोहितला एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध त्याला मोठी खेळी खेळावी लागेल. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत अनेक मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

श्रीलंकेविरुद्ध खराब आकेडवारी

टी 20 मध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळताना रोहितने चार शतक झळकावली आहेत. यात एक शतक श्रीलंकेविरुद्ध आहे. पण तरीही रोहितची श्रीलंकेविरुद्ध आकडेवारी फारशी चांगली नाहीय. रोहितने श्रीलंकेविरुद्ध 13 टी-20 सामन्यात 22.83 च्या सरासरीने 289 धावा केल्या आहेत.

rohit sharma needs to play big innings in sri lanka series ind vs sl 1st t20i