नवी दिल्ली : वनडे वर्ल्ड कपसाठी आता जास्तवेळ उरलेला नाहीय. यावर्षी पाच ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान वनडे वर्ल्ड कप टुर्नामेंट होणार आहे. या वर्ल्ड कप आधी टीम इंडिया अनेक प्रयोग करत आहे. अलीकडेच वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या वनडे सीरीजमध्ये हे पहायला मिळालं. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना शेवटच्या दोन वनडेसाठी विश्रांती देण्यात आली होती. सध्या टीम इंडिया पाच सामन्यांची टी 20 सीरीज खेळत आहे.
या सीरीजमध्ये रोहित आणि कोहली टीमचा भाग नाहीयत. रोहितने वनडे वर्ल्ड कपआधी अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्याबद्दल आपलं मत मांडलं.
सुरुवातीचे दोन सामने गमावले, पण….
रोहितला टीममधील महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्याने मोकळेपणाने आपलं मत मांडलं. T20 सीरीज सुरु असताना का आराम करतोय, ते रोहितने सांगितलं. टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध पाच टी 20 सामन्यांची सीरीज खेळत आहे. सुरुवातीचे दोन सामने टीम इंडियाने गमावले. पण तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला.
त्याच्यावरुन तुम्ही प्रश्न का विचारत नाही?
मागच्यावर्षी T20 वर्ल्ड कप झाला. त्यावेळी सुद्धा सिनियर खेळाडू वनडेमध्ये खेळले नव्हते. यावेळी सुद्धा आम्ही हेच करतोय. त्यामुळे टी 20 खेळत नाहीय, असं रोहितने सांगितलं. तुम्ही सगळ्याच ठिकाणी खेळू शकत नाही. त्याने रवींद्र जाडेजाच नाव घेतलं. जाडेजा सुद्धा टी 20 खेळत नाहीय. त्याच्यावरुन तुम्ही प्रश्न का विचारत नाही. सर्व फोकस माझ्यावर आणि कोहलीवर का? असं रोहित शर्मा म्हणाला.
आता तेच घडतय
रोहितच्या नेतृत्वाखाली मागच्यावर्षी टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप खेळला होता. त्यात सेमीफायनलमध्ये इंग्लंड टीमने टीम इंडियाचा पराभव केला होता. त्यानंतर रोहित आणि कोहली भारतासाठी टी 20 मॅच खेळलेले नाहीत. हार्दिक पांड्या आता टी 20 मध्ये कॅप्टन आहे. टी 20 वर्ल्ड कपनंतर रोहित-विराटला संधी मिळणार नाही, असं बोललं जात होतं. आता तेच घडतय.