IND vs SL: Rohit Sharma साठी टीमचा ‘हा’ खेळाडू सर्वात मोठा मॅच विनर, विजयानंतर खूश झालेल्या रोहितच विधान

| Updated on: Jan 16, 2023 | 7:30 AM

IND vs SL: टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध 3 वनडे सामन्याची सीरीज 3-0 अशी जिंकली. त्यानंतर रोहितने एका खेळाडूच भरपूर कौतुक केलं. या निकालानंतर रोहित शर्मा खूपच आनंदात आहे.

IND vs SL: Rohit Sharma साठी टीमचा हा खेळाडू सर्वात मोठा मॅच विनर, विजयानंतर खूश झालेल्या रोहितच विधान
rohit sharma
Follow us on

Rohit Sharma IND vs SL 3rd ODI: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धची तीन सामन्यांची वनडे सीरीज 3-0 अशी जिंकली. सीरीजच्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने 317 धावांनी मोठा विजय मिळवला. या निकालानंतर रोहित शर्मा खूपच आनंदात आहे. त्याने विजयानंतर एका खेळाडूच भरभरुन कौतुक केलं. हा खेळाडू सीरीजमध्ये टीम इंडियाच्या विजयाचा मोठा हिरो ठरला.

रोहितने कुठल्या प्लेयरच कौतुक केलं?

“ही वनडे सीरीज आमच्यासाठी खूपच उत्तम होती. बऱ्याच सकारात्मक बाबी समोर आल्या. आम्ही चांगली गोलंदाजी केली. गरज पडली, तेव्हा विकेट काढल्या. संपूर्ण सीरीजमध्ये फलंदाजांना खोऱ्याने धावा करताना पाहून चांगलं वाटलं. मोहम्मद सिराजची गोलंदाजी पाहून खूपच चांगलं वाटलं. त्याने जे विकेट काढले, त्यावर त्याचा हक्क होता” असं रोहित शर्मा म्हणाला. मोहम्मद सिराजने सीरीजच्या शेवटच्या सामन्यात 10 ओव्हरमध्ये 4 विकेट काढल्या. त्याने श्रीलंकेच कंबरड मोडलं.

5 वी विकेट नाही मिळाली

“मोहम्मद सिराजमध्ये एक खास प्रतिभा आहे. मागच्या काही वर्षात त्याच्या कामगिरीत मोठी सुधारणा झालीय. भारतीय क्रिकेटसाठी ही चांगली बाब आहे. सिराजला पाचवा विकेट मिळावा, यासाठी आम्ही सर्व प्रयत्न केले. पण दुर्देवाने असं घडलं नाही. त्याच्याकडे काही कल्पना आहेत, त्यावर तो काम करतोय. न्यूझीलंडची टीम पाकिस्तान विरुद्ध सीरीज जिंकून भारतात येत आहे. त्यामुळे त्यांना पराभूत करणं सोपं नसेल” असं रोहित शर्मा म्हणाला.

वनडे सीरीजमध्ये घेतल्या सर्वाधिक विकेट

मोहम्मद सिराज या वनडे सीरीजमधील टीम इंडियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने सीरीजच्या 3 सामन्यात 4.05 च्या इकॉनमीने रन्स देऊन 9 विकेट काढल्या. सर्वाधिक विकेट घेण्यासह मोहम्मद सिराजने किफायती गोलंदाजी केली. मोहम्मद सिराज आगामी न्यूझीलंड विरुद्धच्या सीरीजमध्येही टीम इंडियाची पहिली पसंत असेल.