IND vs ENG 1st ODI: Rohit Sharma त्याच्या SIX मुळे जखमी झालेल्या मुलीला भेटला, टेडी आणि चॉकलेट्सचं गिफ्ट दिलं, VIDEO

| Updated on: Jul 13, 2022 | 1:44 PM

IND vs ENG 1st ODI: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने काल इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला. भारताने इंग्लंड वर 10 गडी राखून (IND vs ENG) दणदणीत विजय मिळवला.

IND vs ENG 1st ODI: Rohit Sharma त्याच्या SIX मुळे जखमी झालेल्या मुलीला भेटला, टेडी आणि चॉकलेट्सचं गिफ्ट दिलं, VIDEO
रोहित शर्माच्या सिक्सरनं चिमुकली जखमी
Follow us on

मुंबई: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने काल इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला. भारताने इंग्लंड वर 10 गडी राखून (IND vs ENG) दणदणीत विजय मिळवला. महत्त्वाचं म्हणजे इंग्लंडला त्यांच्याच घरात पराभवाचं पाणी पाजलं. 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतासाठी कालच्या सामन्यात दोन चांगल्या गोष्टी घडल्या. एक म्हणजे भारतीय गोलंदाजांनी (Team India) आपली ताकत दाखवून दिली. चेंडू स्विंग होण्यासाठी अनुकूल स्थिती असेल आणि खेळपट्टीकडून साथ मिळाली, तर काय करु शकतो, हे दाखवून दिलं. दुसरं म्हणजे रोहित शर्माला सापडलेला सूर. या मॅचद्वारे रोहित शर्मा पुन्हा एकदा फॉर्म मध्ये परतला आहे. त्याने लांब लचक फटके मारले. रोहित 76 धावांची शानदार इनिंग खेळला. रोहितने पाच षटकार खेचले. या पाच पैकी रोहितच्या एक सिक्सची बरीच चर्चा झाली. कारण रोहितचा सिक्स लागून प्रेक्षत स्टँड मध्ये बसलेली एक मुलगी जखमी झाली.

लेग साइडला सिक्स मारला

भारताच्या डावात पाचव्या षटकात ही घटना घडली. वेगवान गोलंदाज डेविड विलीने ओव्हरमधील तिसरा चेंडू खूपच शॉर्ट टाकला. रोहितने त्या बॉलवर हुकचा फटका खेळून लेग साइडला सिक्स मारला. पण हा चेंडू प्रेक्षक स्टँड मध्ये बसलेल्या एका मुलीला लागला. चेंडूचा आघात झाल्यानंतर मुलगी जखमी झाली. लगेच आसपासच्या लोकांनी तिला सावरलं. मुलीचे पिता तिच्यासोबत आले होते. लगेच त्यांनी तिला उचलून घेतलं व सावरण्याचा प्रयत्न केला.

मुलीचं नाव मीरा साल्वी?

सोशल मीडियावर रोहितच्या सिक्सने जखमी झालेल्या त्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काही पोस्टस मध्ये मुलीचं नाव मीरा साल्वी असल्याचा दावा करण्यात आला आहे. ती 6 वर्षांची असल्याचं म्हटलं आहे. मुलीला चेंडू लागल्यानंतर लगेच मेडिकल स्टाफ मदतीसाठी धावल्याचं व्हिडिओ मध्ये दिसतं.

रोहित शर्माकडून त्या मुलीची विचारपूस

रोहित शर्माने सामना संपल्यानंतर त्याच्या षटकारामुळे जखमी झालेल्या मुलीची भेट घेतली. रोहितने त्या मुलीला भेटून तिला टेडी आणि चॉकलेट गिफ्ट केलं. आज तकने हे वृत्त दिलं आहे. भारताने पहिला सामना जिंकून तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.