मुंबई: T20 वर्ल्ड कपच्या (T20 World cup) तयारीमध्ये व्यस्त असलेल्या टीम इंडियाला गुरुवारी मोठा झटका बसला. दुसऱ्या वॉर्म अप मॅचमध्ये (Warm up match) वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 36 धावांनी विजय मिळवला. या पराभवानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit sharma) जोरदार षटकार लगावले. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने पहिली फलंदाजी करताना 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 132 धावा केल्या. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 74 धावा केल्या.
केएल राहुलशिवाय कुठलाच फलंदाज चालला नाही. ऋषभ पंत, दीपक हुड्डा, हार्दिक पंड्या पूर्णपणे फ्लॉप ठरले. दुसऱ्या वॉर्मअप मॅचमध्ये रोहितच्या जागी केएल राहुलने नेतृत्व केलं.
रोहितने कधी मारले सिक्स?
रोहित सराव सामन्यात फलंदाजीसाठी उतरला नाही. पण सराव सत्रात त्याने जोरदार षटकार मारले. वॉर्मअप मॅचनंतर प्रॅक्टिस सेशनमध्ये रोहितची बॅट तळपली. पहिली वॉर्म अप मॅच टीम इंडियाने 13 धावांनी जिंकली होती. दुसऱ्या मॅचमध्ये फलंदाज फ्लॉप ठरले.
Captain Rohit Sharma in full show in the practice session. pic.twitter.com/jytiNCD2SE
— Johns. (@CricCrazyJohns) October 13, 2022
राहुलने स्ट्राइक रेट सुधारण्यात उशीर केला
दुसऱ्या मॅचमध्ये पंत ओपनिंगसाठी मैदानात उतरला होता. पण मोठा फटका खेळण्याच्या नादात तो 9 रन्सवर आऊट झाला. भारताची मधली फळी सुद्धा कोसळली. राहुलने या सामन्यात स्ट्राइक रेटमध्ये सुधारणा केली. मोठे फटके खेळण्यात राहुलने उशिर केला. 43 चेंडूत अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने स्ट्राइक रेट सुधारला.