रोहित शर्मा होणार टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार, मात्र BCCI ची हिटमॅनसमोर महत्त्वाची अट
विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडताच संघाची कमान कोणत्या खेळाडूकडे सोपवली जाईल असा प्रश्न सर्व चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, बीसीसीआयने नवा कसोटी कर्णधार ठरवला असून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
1 / 5
विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडताच संघाची कमान कोणत्या खेळाडूकडे सोपवली जाईल असा प्रश्न सर्व चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, बीसीसीआयने नवा कसोटी कर्णधार ठरवला असून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
2 / 5
इन्साइड रिपोर्टच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा नवा कसोटी कर्णधार बनणार आहे. रोहित शर्माला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी उपकर्णधार बनवण्यात आले होते, आता विराटने राजीनामा दिल्यानंतर तो संघाची कमान सांभाळणार आहे. दुखापतीमुळे रोहित द. आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नाही. त्यामुळे लोकेश राहुलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले होते.
3 / 5
मात्र, रोहित शर्माला कसोटी कर्णधार बनवण्यापूर्वी बीसीसीआय त्याच्याशी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे. रिपोर्ट्सनुसार, निवडकर्ते रोहित शर्माशी वर्कलोड आणि फिटनेसशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करतील. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 'कामाचा ताण (वर्कलोड) खूप जास्त आहे. रोहित शर्माला स्वतःला तंदुरुस्त ठेवावे लागेल. मला वाटते की निवडकर्ते त्याच्याशी बोलतील आणि त्याला फिटनेसवर अतिरिक्त काम करावे लागेल.
4 / 5
रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने त्रस्त आहे. गेल्या वर्षभरात तो दोनदा त्याला बळी पडला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्माला दुखापत झाली आणि कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतून तो बाहेर पडला. त्यामुळेच तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवणे हाही मोठा धोका मानला जाऊ शकतो.
5 / 5
रोहित शर्मा जर कर्णधार झाला तर उपकर्णधार कोण असेल या मुद्द्यावर बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने मोठी गोष्ट सांगितली. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'उपकर्णधार हा टीम इंडियाचा पुढचा लीडर असेल. केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह हे सर्व भावी लीडर आहेत. संघाचा नवा उपकर्णधार कोण असेल, यावर निवडकर्त्यांना खूप विचार करावा लागणार आहे.