इंदोर – टीम इंडियाने काल न्यूझीलंड विरुद्ध दिमाखदार विजय मिळवला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 90 धावांनी विजय मिळवून 3-0 ने सीरीज जिंकली. रोहित शर्माने जवळपास 500 दिवसानंतर शतक ठोकलं. ही संपूर्ण सीरीज टीम इंडियासाठी सुखावणारी आहे. पण, तरीही काल एका टप्प्यावर रोहित शर्मा मैदानात वैतागला होता. टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 386 धावांच विशाल लक्ष्य दिलं होतं. डेवॉन कॉनवे धुवाधार बॅटिंग करत होता. त्याने 71 चेंडूत शतक झळकावलं. फिल एलनच्या रुपाने शुन्यावर न्यूझीलंडचा पहिला विकेट गेला. पण त्यानंतर डेवॉन कॉनवेने सूत्र आपल्याहाती घेतली. कॉनवे आणि हेन्री निकोलसने भारतीय गोलंदाजांवर दबाव टाकला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी केली. त्यामुळे रोहितची चिंता वाढली होती.
दोन महत्त्वाच्या पार्ट्नरशिप
कॉनवे विकेटवर असेपर्यंत सामना संपलेला नाही, याची रोहितला जाणीव होती. हेन्रीनंतर कॉनवेने डॅरिल मिचेलसोबत 78 धावांची भागीदारी केली. त्यावेळी रोहितने शार्दुल ठाकूरच्या हाती चेंडू सोपवला. शार्दुलने आपल्या कॅप्टनला निराश केलं नाही. शार्दुलने बाऊन्सर चेंडूवर मिचेलला आऊट केलं. त्याने इशान किशनकडे झेल दिला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर कॅप्टन टॉम लॅथमला तंबूत पाठवलं.
— Anna 24GhanteChaukanna (@Anna24GhanteCh2) January 24, 2023
एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट काढूनही रोहित नाखूश
एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट घेऊनही रोहित शार्दुलवर फार समाधानी नव्हता. कॉनवेने शार्दुलच्या त्याच ओव्हरमध्ये शेवटच्या दोन चेंडूंवर बाऊंड्री मारली. शार्दुलने दोन्ही शॉर्ट पीच चेंडू टाकेल. त्याावर कॉनवेने सलग दोन बाऊंड्री मारल्या. त्यामुळे रोहित शार्दुलवर वैतागला.
रोहितने काय सांगितलं?
रोहित शार्दुलजवळ गेला व त्याच्याशी बोलला. रोहित त्याच्यावर चिडल्याच स्पष्ट दिसत होतं. रोहितच्या देहबोलीतून राग व्यक्त झाला. तो शार्दुलला शॉर्ट पीच ऐवजी वेगळ्या टप्प्यावर चेंडू टाकायला सांगत होता. त्यानंतर शार्दुलने पुढच्याच ओव्हरमध्ये ग्लेन फिलिप्सला बाद केलं. शार्दुलने या सामन्यात 6 ओव्हरमध्ये 45 धावा देऊन 3 विकेट काढल्या.