Rohitm Sharma : मुंबई इंडियन्सचे आयपीएल 2024 मध्ये रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याकडे सोपवले आहे. मुंबई इंडियन्सच्या या निर्णयानंतर चाहत्यांना एकद धक्का बसला होता. चाहत्यांनी या विरोधात टीका देखील केली. सोशल मीडियावर अनेकांनी हा अन्यायकारक निर्णय असल्याचं म्हटलं आहे. कारण रोहित शर्माने पाच वेळा मुंबईला विजेतेपद जिंकवून दिले आहे. या निर्णयानंतर रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यातील फरक स्पष्ट दिसत आहे. मुंबई इंडियन्सला पहिल्या तीनही सामन्यांमध्ये दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. रोहित शर्माकडे पुन्हा कर्णधारपद सोपवण्याची मागणी चाहते करु लागले आहेत. दरम्यान, रोहित शर्माबाबत एक मोठा खुलासा झाला आहे.
रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससोबत आता जास्त काळ राहणार नसल्याचं समोर आले आहे. या आयपीएल सीझननंतर रोहित शर्मा मुंबईकडून खेळताना दिसणार नाहीये. समोर आलेल्या माहितीनुसार, रोहित शर्माने पुढच्या सीजनसाठी मुंबईकडून न खेळण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसणार आहे.
मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारदावरुन हटवल्यानंतरच खरंतर हा वाद सुरु झाला होता. कारण चाहत्यांना देखील ते आवडले नव्हते. पण आता बातमी अशी समोर आली आहे की, रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पुढच्या सीजन त्यांच्याकडून खेळणार नसल्याचं स्पष्ट सांगितले आहे.
हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर आणि त्याच्या निर्णयावर फ्रेंचायजी खूश नसल्याचं बोललं जात आहे. फॅन्स देखील त्याच्यावर नाराज आहेत. दोन खेळाडूंचे मैदानावरील अनेक निर्णयांवर एकमत होत नसल्याने त्याचा थेट परिणाम संघाच्या कामगिरीवर होताना दिसत आहे. त्यामुळे एमआयच्या ड्रेसिंग रूमच्या वातावरणावरही बदल झाला आहे.
रिपोर्टनुसार रोहित शर्माला पुन्हा कर्णधार बनवण्याचा विचार केला जात असला तरी हार्दिक पांड्याला अजूनही संधी मिळू शकते. यापूर्वीही अशा अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे रोहित शर्माला पुन्हा कर्णधारपद मिळण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे. भविष्यातही हार्दिक मुंबई इंडियन्सची धुरा हार्दिककडेच असेल असे मानले जात आहे.
रोहित शर्माने जर मुंबई इंडियन्स संघ सोडला तर तो कोणत्या संघाकडून खेळणार अशा चर्चा ही सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत. अनेक जण म्हणत आहे की, त्याला कोणतीही फ्रेंचायजी आपल्या संघात घेऊ शकते. कारण तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे.