IPL 2024 चा निम्मा सीजन संपला असून टुर्नामेंटमधील लोकप्रिय संघ मुंबई इंडियन्सच आव्हान संपुष्टात आलं आहे. मुंबई इंडियन्सचा काल कोलकाता नाइट रायडर्सने वानखेडे स्टेडियमवर 24 धावांनी पराभव केला. केकेआरने पहिली बॅटिंग करताना मुंबईला विजयासाठी 170 धावांच टार्गेट दिलं होतं. पण मुंबई इंडियन्सची टीम फक्त 145 धावांपर्यंत पोहोचू शकली. मुंबई इंडियन्सचा 24 धावांनी पराभव झालां. मुंबई इंडियन्सचे उर्वरित सामने आता फक्त औपचारिकता मात्र आहेत. मुंबईच्या या प्रदर्शनानंतर टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी सुद्धा एक चिंता वाढवणारी बातमी आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माच्या पाठदुखीच्या त्रासाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे आगमी T20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच्या सहभागावरुन चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे.
काल कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुख्य प्लेइंग इलेव्हन जाहीर झाली, त्यामध्ये रोहित शर्माच नाव नव्हतं. याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. रोहित शर्माचा टीममध्ये इम्पॅक्ट प्लेयर म्हणून समावेश करण्यात आला. मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या प्लेयर्समध्ये रोहित दुसऱ्या स्थानावर आहे. रोहित शर्मा फक्त फलंदाजीला मैदानात उतरला. त्याने 12 चेंडूत 11 धावा केल्या.
पियुष चावलाने रोहित बद्दल काय सांगितलं?
सामना संपल्यानंतर बोलताना मुंबई इंडियन्सचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने रोहित शर्मा मुख्य प्लेइंग इलेव्हनमध्ये का नव्हता? त्याचा खुलासा केला. “त्याला सौम्य पाठदुखीचा त्रास जाणवत होता. खबरदारी म्हणून त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला नाही” असं चावला म्हणाला.
वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना कोणाबरोबर?
मुंबई इंडियन्सची टीम आता विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर गेलीय. त्यामुळे उर्वरित तीन सामन्यात गरज असल्यास रोहित शर्माला आता विश्रांती मिळू शकते. रोहित शर्मा टी 20 वर्ल्ड कपमध्ये कॅप्टन आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंड विरुद्ध होणार आहे. मागच्या 10 वर्षांपासून टीम इंडियाने एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. सेमीफायनल, फायनलमध्ये टीम इंडियाच आव्हान संपुष्टात आलय. यावेळी रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकावा अशी कोट्यवधील क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे.