IND vs SA 3rd ODI | दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनने शानदार शतक झळकावलं. टीम इंडियाने हा सामना जिंकला. संजू सॅमसन बऱ्याच काळापासून टीम इंडियामध्ये आपल स्थान पक्क करण्यासाठी संघर्ष करत आहे. अनेकदा चांगला परफॉर्मंन्स करुनही संजूला टीममध्ये स्थान मिळालं नाही. संजूच्या सेंच्युरीनंतर फॅन्स खूप खूश आहेत. संजूच स्थान टीममध्ये टिकून राहील का? यावरुन आता वादविवाद सुरु आहेत. या दरम्यान कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी एक टि्वट केलय. त्यावरुन फॅन्स आपसात भिडले आहेत.
तिसऱ्या वनडे मॅचबद्दल बोलायच झाल्यास टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. 296 धावा केल्या. तिसऱ्या नंबरवर फलंदाजीला आलेल्या संजू सॅमसनने या मॅचमध्ये 108 धावांची शतकी खेळी साकारली. संजूने 114 चेंडूत 6 फोर आणि 3 सिक्स मारले. संजूच्या दमदार फलंदाजीमुळे टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारता आली. टीम इंडियाने हा सामना 78 धावांनी जिंकला.
फॅन्स भडकले, त्यांचं काय म्हणणं?
या इनिंगनंतर संजूच सर्वत्र कौतुक सुरु झालय. कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी सुद्धा टि्वट केलय. संजू तिथेच फलंदाजी करतोय, जिथे त्याने केली पाहिजे. हर्षा संजूच्या नंबर 3 वर फलंदाजीबद्दल बोलत होते. पण यावरुन फॅन्स भडकले. कारण वनडेमध्ये नंबर 3 वर विराट कोहली बॅटिग करतो. विराटला नंबर 3 वरुन हटवाव असं तुमच म्हणण आहे का? असं फॅन्सनी म्हटलय. त्यावरुन वादविवाद वाढत चाललाय.
The man who is batting there is one of the greatest there has ever been. I am talking about the number that is best for Sanju Samson, not who should be batting no 3 for India in ODI cricket permanently. Till Virat is around, that is his. https://t.co/R8FB6Tk28k
— Harsha Bhogle (@bhogleharsha) December 21, 2023
हर्षा भोगले यांनी काय स्पष्टीकरण दिलं?
हर्षा भोगले यांनी त्यावर टि्वट करुन स्पष्टीकरण दिलय. “नंबर 3 च्या पोजिशनवर जो फलंदाज खेळतोय, तो आतापर्यंतच महान फलंदाज आहे. संजू सॅमसनला कुठला नंबर सूट होतो? त्या बद्दल मी बोलत होतो. टीम इंडियासाठी नंबर 3 वर कोणी बॅटिंग केली पाहिजे, हे मी म्हटलेलं नाही. कारण जो पर्यंत विराट कोहली आहे, हा नंबर त्याचाच आहे” असं हर्षा भोगले यांनी म्हटलय.