अबू धाबी : IPL 2021 स्पर्धेत आज अबू धाबीच्या शेख जायद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 47 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स या दोन संघांमध्ये खेळवला गेला. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 189 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र राजस्थानच्या फलंदाजांनी हा डोंगर अगदी सहजपणे सर केला. यशस्वी जयसवालची वादळी सुरुवात आणि शिवम दुबेच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थाने 7 गडी आणि 15 चेंडू राखून चेन्नईने दिलेलं आव्हान पूर्ण केलं.
राजस्थानचे सलामीवीर यशस्वी जयसवाल आणि एव्हिन लुईसने या सामन्यात वादळी सुरुवात केली. 5.2 षटकांमध्ये दोघांनी 77 धावांची सलामी दिली. लुईस 27 धावांवर बाद झाल्यानंतरही यशस्वी जयसवालने फटकेबाजी सुरुच ठेवली. त्याने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक फटकावलं. त्याने 6 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्यानंतर मैदानात आलेल्या संजू सॅससनने 28 धावांची खेळी केली. सलामीवीरांनी चांगली सुरुवात करुन दिल्याचा शिवम दुबेने चांगलाच फायदा उचलला, जयसवाल बाद झाल्यानंतर त्याने जोरदार फटकेबाजी केली. दुबेने 42 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी केली. दुबेने 4 चौकार आणि 4 षटकार फटकावले.
चेन्नईचा शार्दुल ठाकूर व्यतिरिक्त उर्वरित सर्व गोलंदाज निष्प्रभ ठरले. त्याने 4 षटकात 30 धावा देत 2 बळी घेतले. के. एम. आसिफने 2.1 षटकात 18 धावा देत एक बळी घेतला.
राजस्थानने 17.3 षटकांमध्ये चेन्नईने दिलेलं 190 धावांचं आव्हान पार केलं आहे. त्याने चेन्नईवर 7 गडी आणि 15 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला.
राजस्थानने तिसरी विकेट गमावली आहे. शार्दुल ठाकूरने संजू सॅमसनला 28 धावांवर असताना ऋतुराज गायकवाडकरवी झेलबाद केलं. (राजस्थान 170/3)
शिवम दुबेनं 31 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं आहे.
राजस्थानने दुसरी विकेट गमावली आहे. केएम आसिफने यशस्वी जयसवालला 50 धावांवर असताना यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीकरवी झेलबाद केलं. (राजस्थान 83/2)
चेन्नईला पहिली विकेट मिळाली आहे. शार्दुल ठाकूरने एव्हिन लुईस 27 धावांवर असताना जोश हेजलवूडकरवी झेलबाद केलं. (राजस्थान 77/1)
डावातील अखेरच्या चेंडूवर तब्बल 108 मीटर लांब षटकार ठोकत ऋतुराज गायकवाडने आयपीएल कारकिर्दीतलं पहिलं शतक साजरं केलं.
चेन्नईला चौथा झटका, अंबाती रायडू बाद, त्याने 4 चेंडूत फक्त 2 धावा केल्या
चेन्नईला तिसरा झटका, मोईन अली बाद, मोईनच्या 17 चेंडूत 21 धावा
राहुल तेवतियाने चेन्नईला दुसरा झटका दिला आहे. त्याने सुरेश रैनाला शिवम दुबेकरवी झेलबाद केलं. (57/2)
चेन्नईने पहिली विकेट गमावली आहे. राहुल तेवतियाने फाफ डुप्लेसीला यष्टीरक्षक संजू सॅमसनकरवी यष्टिचिक केलं. त्याने 25 धावांचं योगदान दिलं. (चेन्नई 47/1)
आकाश सिंगच्या पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर ऋतुराज गायकवाडने चौकार वसूल करत त्याचं स्वागत केलं.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
? Toss News from Abu Dhabi ?@rajasthanroyals have elected to bowl against @ChennaiIPL. #VIVOIPL #RRvCSK
Follow the match ? https://t.co/jo6AKQBhuK pic.twitter.com/ZT4lpUWXkI
— IndianPremierLeague (@IPL) October 2, 2021