अहमदाबाद : गुजरात टायटन्सने (GT) 2022 (IPL 2022 )पासून त्यांच्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्याच हंगामात संघाने चमकदार कामगिरी केली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स हा या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. गुजरातने ग्रुप स्टेजमधील 14 सामन्यांपैकी 10 सामने जिंकले आणि 4 सामने गमावले. संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. क्वालिफायर 1 मध्ये, संघाने राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. राजस्थान रॉयल्स हा प्लेऑफमध्ये स्थान मिळविणारा तिसरा संघ होता. परंतु निव्वळ धावगतीनुसार ते गुणतालिकेत पहिल्या 2 मध्ये राहिले. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानसाठी गट स्टेज चढ-उतार होता, संघाची फलंदाजी तसेच गोलंदाजी अप्रतिम होती. ग्रुप स्टेजच्या 14 मॅचमध्ये राजस्थानने 9 जिंकले आणि 5 मॅच गमावल्या. दरम्यान, रविवारी फायनल अहमदाबादमध्ये होणार असून तेथिल हवामान कसं असणार, ते जाणून घ्या…
नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी संथ आहे. इथेच सुरुवातीला गोलंदाजांना मदत होते. स्टेडियम मोठे आहे, त्यामुळे फलंदाजांसाठीही ते सोपे नाही. नाणेफेक निर्णायक ठरणार आहे. येथे प्रथम गोलंदाजी करणे योग्य ठरेल.
रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये फक्त पाऊस पडू नये. म्हणजे आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील फायनल चांगला होऊ शकेल आणि क्रिकेटप्रेमींना आनंद घेता येईल.