RR vs PBKS IPL 2023 : IPL 2023 च्या 8 व्या सामन्यात पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सला 5 धावांनी हरवलं. पंजाब किंग्सने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 197 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान टीमने 192 धावा केल्या. भले, राजस्थानची टीम ही मॅच हरली असेल, पण त्यांना एक खेळाडू गवसलाय. तुम्ही म्हणाल हा खेळाडू कोण?. राजस्थान रॉयल्सला गुवाहाटीमधील सामन्यात एक नवीन स्टार मिळाला आहे. आम्ही बोलतोय, ध्रुव जुरेलबद्दल. त्याने जोरदार फटकेबाजीच प्रदर्शन या मॅचमध्ये केलं.
ध्रुव जुरेलने पंजाब किंग्स विरुद्ध 15 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या. 7 व्या विकेटसाठी त्याने शिमरॉन हेटमायरसोबत 26 चेंडूत 61 धावा केल्या. ध्रुव जुरेलची इनिंग आणि भागीदारीमुळे पंजाब किंग्सचा पराभव जवळपास निश्चित दिसत होता. पण असं झालं नाही. ध्रुव जुरेल टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. पण या खेळाडूने आपल्या टॅलेंटने सर्वांच मन जिंकलं.
कोण आहे ध्रुव जुरेल?
हा 22 वर्षांचा युवा खेळाडू कोण आहे? त्या बद्दल जाणून घ्या. ध्रुव जुरेल यूपीचा फर्स्ट क्लास क्रिकेटर आहे. वर्ष 2022 मध्ये या खेळाडूला राजस्थान रॉयल्सने 20 लाख रुपयामध्ये विकत घेतलं होतं. 2023 साठी त्याला रिटेन करण्यात आलं. जुरेलने वर्ष 2019 मध्ये झालेल्या अंडर 19 आशिया कपमध्ये टीम इंडियाच नेतृत्व केलं होतं. टीम इंडियाने आशिया कप जिंकला होता.
त्याची टेक्निक कमाल
ध्रुव जुरेल फर्स्ट क्लासमध्ये 11 सामने खेळलाय. यात त्याने 48 पेक्षा जास्त सरासरीने 587 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि तीन अर्धशतकं आहेत. जुरेलकडे कमालीची टेक्निक आहे. पेसर्स आणि स्पिनर्स विरुद्ध तो सहज धावा फटकावू शकतो. हीच बाब पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात मैदानात पहायला मिळाली.
वडिल लढले कारगिल युद्ध
ध्रुव जुरेलचे वडिल रिटायर्ड सैनिक आहेत. 1999 साली ते पाकिस्तान विरुद्ध कारगिल युद्धात लढले होते. भारताने त्या युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवला होता. नेम सिंह जुरेल युद्ध लढले, तेव्हा ध्रुवचा जन्म झाला नव्हता. ध्रुवला आपल्याप्रमाणे फौजी बनवण्याची वडिलांची योजना होती. पण बालपणापासून त्याला क्रिकेटची आवड होती. आज त्यांचा मुलगा आयपीएलमध्ये यशाची कमान चढतोय. ध्रुव जुरेलचा खेळ पाहून हा प्लेयर पुढे नाव कमावणार हे स्पष्ट दिसतय. आयपीएलमधून एक नवीन स्टार मिळालाय.