मुंबई: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) हल्लाबोल नारा आहे . IPL 2022 च्या सीजनमध्ये सलामीवीर जोस बटलर (Jos Buttler) हा जो नारा आहे, तसाच खेळ दाखवतोय. मागच्या काही सामन्यात जोस बटलरने तुफान फटेकबाजी केली आहे. ऑरेंज कॅपच्या (Orange cap) शर्यतीत तो पहिल्या स्थानावर आहे. आतापर्यंत त्याने तीन शतकं झळकावली आहेत. पण आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध त्याला असा खेळ दाखवता आला नाही. जोस बटलरची बॅट आज तळपली नाही. त्याचा परिणाम आज राजस्थानच्या संघाच्या कामगिरीतून दिसून येतोय. जोस बटलरचं स्वस्तात बाद होणं, राजस्थान संघासाठी मोठा फटका आहेच, पण त्याच्यासाठी सुद्धा हा एक झटका आहे. जोस बटलरची आज ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडने शिकार केली. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आज टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला.
राजस्थानच्या पहिल्या तीन विकेट पावरप्लेमध्येच गेल्या. त्यामुळे त्यांचा डाव अडचणीत आला. देवदत्त पडिक्कल आणि रविचंद्रन अश्विन या दोन विकेट सिराजने, तर बटलरची विकेट हेझलवूडने घेतली.
मोहम्मद सिराजने जबरदस्त डाइव्ह मारुन जोस बटलरची कॅच घेतली पहा VIDEO
RCB विरुद्ध जोस बटलरने नऊ चेंडूत फक्त आठ धावा केल्या. त्याने फक्त एक चौकार लगावला. IPL 2022 च्या पीचवर बटलरची ही आठवी इनिंग होती. 88.88 त्याचा स्ट्राइक रेट होता. हेझलवूडने त्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर मोहम्मद सिराजकरवी झेलबाद केले. सिराजने डाइव्ह मारुन झेल घेतला. IPL 2022 मध्ये पहिल्यांदाच बटलर एक आकडी धावसंख्येवर आऊट झाला.