जयपूर : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. प्लेऑफमध्ये दाखल होण्यासाठी प्रत्येक टीमचा संघर्ष सुरु आहे. आता प्रत्येक मॅच ‘करो या मरो’ आहे. आयपीएल टुर्नामेंट निर्णायक टप्प्यावर आहे. कुठल्याही टीमला पराभव परडवणारा नाहीय. पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या चार स्थानांसाठी स्पर्धा आहे. आज IPL 2023 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बँगलोरमध्ये सामना झाला. आयपीयएलमधील हा 60 सामना होता.
प्लेऑफचा विचार करता, दोन्ही टीम्ससाठी हा सामना खूप महत्वाच होता. RCB ने ही मॅच 112 धावांनी जिंकली आहे. आरसीबीच्या 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थाची टीम 59 रन्सवर ऑलआऊट झाली. आयपीएलच्या इतिहासातील राजस्थान टीमने नोंदवलेली ही तिसरी नीचांकी टोटल आहे.
रॉयल चॅलेंजर्स बँगोलरने राजस्थान रॉयल्सचा धुव्वा उडवला आहे. RCB ने ही मॅच 112 धावांनी जिंकली आहे. आरसीबीच्या 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थाची टीम 59 रन्सवर ऑलआऊट झाली.
फटकेबाजी करणारा हेटमायर आऊट झाला आहे. त्याने 19 चेंडूत 35 धावा करताना 1 फोर आणि 4 सिक्स मारले. मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर ब्रेसवेलने हेटमायरची कॅच पकडली. 10 ओव्हर अखेरीस राजस्थानच्या 8 बाद 59 धावा झाल्या आहेत.
करण शर्माने 8 वी ओव्हर टाकली. त्याच्या ओव्हरमध्ये शिमरॉ़न हेटमायरने 3 बॉलमध्ये 3 सिक्स मारले. त्यामुळे राजस्थानची धावसंख्या 50 पर्यंत पोहोचली. पण याच ओव्हरमध्ये आर. अश्विन रनआऊट झाला. अश्विन शुन्यावर तंबूत परतला. 8 ओव्हर अखेरीस राजस्थानच्या 7 बाद 50 धावा झाल्या आहेत.
RCB ने राजस्थानला सहावा धक्का दिला आहे. ब्रेसवेलच्या गोलंदाजीवर ध्रुवर जुरेल 1 रन्सवर आऊट झाला. 7 ओव्हर अखेरीस राजस्थानची 6 बाद 31 स्थिती आहे.
RCB ने राजस्थानला पाचवा धक्का दिला आहे. वेन पार्नेलने ज्यो रुटला LBW बाद केलं. रुटने 15 चेंडूत 10 धावा करताना एक चौकार लगावला. पावरप्लेमध्ये राजस्थानची वाट लागली आहे. 6 ओव्हर अखेरीस राजस्थानच्या 5 बाद 28 धावा झाल्या आहेत. वेन पार्नेल भन्नाट बॉलिंग करतोय. त्याने 3 ओव्ह्रर्समध्ये 10 धावा देताना 3 विकेट काढल्या आहेत. मोहम्मद सिराज, ब्रेसवेलने प्रत्येकी एक विकेट काढली.
RCB ने राजस्थानला चौथा धक्का दिला आहे. देवदत्त पडिक्कल ब्रेसवेलच्या बॉलिंगवर मोहम्मद सिराजकरवी कॅचआऊट झाला. त्याने 4 चेंडूत 4 रन्स केले. 4.2 ओव्हर्समध्ये राजस्थानच्या 4 बाद 20 धावा झाल्या आहेत.
आधी यशस्वी जैस्वाल, त्यानंतर जोस बटलर आणि आता कॅप्टन संजू सॅमसन आऊट झाला आहे. पार्नेलच्या बॉलिंगवर सॅमसनची विकेटकीपर अनुज रावतने कॅच घेतली. संजूने 5 चेंडूत 4 धावा करताना एक चौकार लगावला. राजस्थानने 2 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावल्या आहेत. 2 ओव्हर अखेरीस राजस्थानच्या 3 बाद 11 धावा झाल्या आहेत.
यशस्वी जैस्वाल पाठोपाठ राजस्थान रॉयल्सला दुसरा झटका बसला आहे. वेन पार्नेलने जोस बटलरला शुन्यावर आऊट केलं. बटलरला पार्नेलने मोहम्मद सिराजकरवी कॅचआऊट केलं. 1.2 ओव्हर्समध्ये राजस्थानची 2 बाद 6 धावा स्थिती आहे.
राजस्थान रॉयल्सला मोठा झटका बसला आहे. यशस्वी जैस्वाल शुन्यावर OUT झाला आहे. मोहम्मद सिराजने त्याला कोहलीकरवी कॅच आऊट केलं. पहिल्या ओव्हर अखेरीस राजस्थानच्या 1 बाद 5 धावा झाल्या आहेत.
20 ओव्हर अखेरीस RCB च्या 5 बाद 171 धावा झाल्या आहेत. रावतने 11 चेंडूत नाबाद (29) आणि ब्रेसवेलने 9 चेंडूत नाबाद (9) धावा केल्या. केएम असीफने लास्ट ओव्हर टाकली. रावतने शेवटच्या तीन चेंडूंवर 6,6,4 धावा वसूल केल्या. त्यामुळे RCB ची टीम 170 च्या पुढे गेली.
मोक्याच्या क्षणी राजस्थानला RCB ची मोठी विकेट मिळाली. हाफ सेंच्युरी झळकवून दमदार फलंदाजी करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला संदीप शर्माने क्लाीन बोल्ड केलं. मॅक्सवेलने 33 चेंडूत 54 धावा केल्या. त्याने 5 फोर, 3 सिक्स मारले. 18 ओव्हर अखेरीस RCB च्या 5 बाद 143 धावा झाल्या आहेत.
आधी कॅप्टन फाफ डु प्लेसी, त्यानंतर महीपाल लोमरोर आणि आता दिनेश कार्तिक आऊट झालाय. कार्तिकला भोपळाही फोडता आला नाही. एडम झम्पाने 16 व्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेऊन RCB ला बॅकफूटवर ढकललं. 16 ओव्हर्समध्ये RCB च्या 4 बाद 123 धावा झाल्या आहेत.
महीपाल लोमरोरच्या रुपाने आरसीबीला तिसरा झटका बसलाय. अवघ्या 1 रन्सवर झम्पाच्या गोलंदाजीवर जुरेलकडे त्याने कॅच दिली. 15.2 ओव्हर्समध्ये RCB च्या 3 बाद 120 धावा झाल्या आहेत.
हाफ सेंच्युरी झळकवल्यानंतर ओपनर फाफ डु प्लेसी OUT झाला. असीफच्या गोलंदाजीवर जैस्वालने त्याचा झेल घेतला. डु प्लेसीने 44 चेंडूत 55 धावा केल्या. यात 3 फोर आणि 2 सिक्स आहेत. 15 ओव्हर अखेरीस RCB च्या 2 बाद 120 धावा झाल्या आहेत. ग्लेन मॅक्सवेल 26 चेंडूत 41 रन्सवर खेळतोय. यात 4 फोर आणि 2 सिक्स आहेत.
10 ओव्हर अखेरीस RCB च्या 1 बाद 78 धावा झाल्या आहेत. डु प्लेसी 30 चेंडूत (37) आणि मॅक्सवेल 11 चेंडूत (20) रन्सवर खेळतोय.
9 ओव्हर अखेरीस RCB च्या 1 बाद 71 धावा झाल्या आहेत. डु प्लेसी (35) आणि मॅक्सवेल (15) रन्सवर खेळतोय.
RCB ची हाफ सेंच्युरी होताच विराट कोहली OUT झाला. केएम असिफच्या गोलंदाजीवर यशस्वी जैस्वालने त्याचा झेल घेतला. विराटने 19 चेंडूत 18 धावा करताना एक चौकार लगावला. विराटला आज राजस्थानच्या गोलंदाजांनी मुक्तपणे फलंदाजी करु दिली नाही. 8 ओव्हर अखेरीस RCB च्या 1 बाद 61 धावा झाल्या आहेत.
6 ओव्हर्सचा पावरप्ले संपला आहे. बँगलोरने बिनबाद 42 धावा केल्या आहेत. कॅप्टन फाफ डु प्लेसी (23) आणि विराट कोहली (17) धावांवर खेळतोय.
4 ओव्हर अखेरीस आरसीबीच्या बिनबाद 29 धावा झाल्या आहेत. कॅप्टन फाफ डु प्लेसी (16) आणि विराट कोहली (12) धावांवर खेळतोय.
3 ओव्हर अखेरीस आरसीबीच्या बिनबाद 17 धावा झाल्या आहेत. कॅप्टन फाफ डु प्लेसी आणि विराट कोहलीची जोडी मैदानात आहे.
राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनने दुसऱ्याच ओव्हरमध्ये एडम झम्पा या स्पिनरला बॉलिंगसाठी आणलं. 2 ओव्हर अखेरीस RCB च्या बिनबाद 12 धावा झाल्या आहेत.
राजस्थान विरुद्ध बँगलोर सामन्याला सुरुवात झाली आहे. विराट कोहली आणि डुप्लेसी ही बँगलोरची सलामीची जोडी मैदानात आहे. राजस्थानकडून संदीप शर्माने पहिली ओव्हर टाकली. RCB च्या बिनबाद 9 धावा झाल्या आहेत.
राजस्थानचे 12 सामन्यात 12 पॉइंट्स आहेत. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे 11 सामन्यात 10 पॉइंट्स आहेत. राजस्थानसाठी प्लस पॉइंट हा आहे की, त्यांचा रनरेट चांगला आहे. म्हणजे फक्त त्यांना जिंकायच आहे. तेच RCB ला फक्त विजय नकोय, तर महाविजयाची गरज आहे. म्हणजेच त्यांना रनरेटचा विचार करावा लागेल.
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कॅप्टन फाफ डु प्लेसीने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्सची टीम गोलंदाजी करणार आहे.
जयपूरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने राजस्थान रॉयल्सला 2012 मध्ये शेवटच हरवलं होतं. IPL 2023 मध्ये बँगलोरला त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल.
राजस्थान आणि बँगलोरच्या टीममध्ये याआधी 29 सामने झाले आहेत. बँगलोरची टीम 14 वेळा अजिंक्य ठरली आहे. राजस्थान 12 वेळा जिंकली आहे. मागच्या 5 सामन्यांचा विचार केल्यास 3-2 ने RCB ची बाजू वरचढ आहे.